Arvind Kejriwal : तिहारमधील अरविंद केजरीवाल मूलभूत अधिकारांपासून वंचित; नेमके काय घडले?

Tihar Jail : मुख्यमंत्री केजरीवाल यांचा अपमानित करण्यासाठीच केंद्र सरकारच्या आदेशानुसार तिहार प्रशासन वागत असल्याचा आरोप आप नेते संजय सिंह यांनी केला आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : केंद्र सरकारच्या आदेशानुसार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अन्याय होत आहे. केजरीवाल यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार सध्या तिहार तुरुंग Tihar Jail प्रशासन करत आहे. त्यांना, त्यांची पत्नी सुनीता यांच्याशी समोरासमोर भेटण्यास नकार दिला. हाच प्रकार पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबाबतही घडल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी शनिवारी (ता. 13) केला. Tihar Jail Deny Arvind Kejriwal Fundamental Rights.

सिंह म्हणाले, अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांच्या पत्नी सुनीता यांनी भेटण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी सांगण्यात आले की तुम्ही पतीला समोरासमोर भेटू शकत नाही. मात्र खिडकीच्या झरोक्यातून त्यांच्याशी बोलू शकता. दरम्यान, गंभीर गुन्हेगारांनाही बॅरेकमध्ये भेटण्याची परवानगी आहे. मात्र केजरीवाल यांच्याबाबतच प्रशानस असे अमानवी वर्तन का करत आहे, असा प्रश्नही सिंह यांनी उपस्थित केला आहे.

तिहार तुरुंगात अनेक बैठका होतात. भयंकर गुन्हेगारांनाही बॅरेकमध्ये भेटण्याची परवानगी आहे. मात्र दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला भेटण्यास परवानगी मिळत नाही. त्यांच्या पत्नीला खिडकीच्या झरोक्यातून भेटण्यास सांगितले जाते. प्रशासनाचे हे कृत्य अमानवीय आहे. असे फक्त मुख्यमंत्री केजरीवाल यांचा अपमानित करण्यासाठीच केले जात असल्याचा दावा संजय सिंह Sanjay Singh यांनी केला. दरम्यान, सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत तिहार प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Arvind Kejriwal
Shivsena UBT : 'नकली शिवसेना अन् नकली राष्ट्रवादी'वरून महाराष्ट्रात धुरळा

कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केलीआहे. ते सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. दरम्यान, त्यांना प्रथम ईडीच्या कोठडीत आणि आता 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Kejriwal
Losksabha Election : पालघर मतदारसंघावरून भाजपा-शिवसेनेत रस्सीखेच सुरूच; उमेदवाराचा तिढा कायम!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com