Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'तुतारी' देशभर वाजणार, पण 'घड्याळा'ची धाकधूक; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Supreme Court On NCP : शरद पवारांना मिळालेले तुतारी वाजवणारा माणूस लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत वापरता येणार आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष नाव आणि चिन्हाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार गट यांच्यात वाद सुरू आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. 19) झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शरद पवारांना दिलासा दिला, तर अजित पवार गटाची धाकधूक वाढवली आहे. Sharad Pawar Vs Ajit Pawar

कोर्टाच्या या आदेशानुसार शरद पवारांना (Sharad Pawar) मिळालेले 'तुतारी वाजवणारा माणूस' लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत वापरता येणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिले आहे. मात्र, यापुढे अजित पवार गटाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रचारसभेत घड्याळ चिन्ह वापरताना एक नोट वापरावी लागणार आहे. घड्याळ चिन्हाच्या चित्रापुढे 'घड्याळ चिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे', असा उल्लेख करावा लागणार आहे. ही नोट सर्वांना दिसेल अशा ठळक अक्षरात लिहावी, असेही कोर्टाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोर्टाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा दिला आहे. शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्हाचा वापर करू शकतो. शरद पवारांना दिलासा देताना कोर्टाने निवडणूक आयोगालाही (Election Commission) या चिन्हाबाबत ताकीद दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले तुतारी चिन्ह अन्य कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला देऊ नये, असे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत.

अजित पवारांची धाकधूक वाढली

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाला प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवारांचा फोटो वापरू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाने अजित पवार गटाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. अजित पवार गटाने यापुढे घड्याळ चिन्ह वापरताना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी, 'घड्याळ चिन्हाबाबतचा निकालाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे', असे ठळक अक्षरात उल्लेख करावा लागणार आहे. न्यायालयाच्या निकालाचे शरद पवार गटाकडून स्वागत करण्यात आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT