Abhishek Ghosalkar Death Case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकरांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Vinod Ghosalkar : विविध मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असून, तपास यंत्रणांविरोधात याचिका दाखल करणार आहे.
Vinod Ghosalkar
Vinod GhosalkarSarlarnama

Mumbai Political News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची जुन्या वादातून फेसबुक लाइव्हमध्येच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दीड महिन्यापूर्वी झालेल्या या प्रकरणी सुरू असलेल्या तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप अभिषेक यांचे वडील आणि ठाकरे गटाचे नेते, माजी आमदार विनोद घोसाळकरांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Abhishek Ghosalkar Death Case

विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) म्हणाले, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्याप्रकरणी सरकार आम्हाला मदत करत नाही. पोलिस यंत्रणा कुणाच्या तरी दाबाबखाली काम करत आहे. त्यामुळे पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. सध्या असलेली तपास यंत्रणा योग्य दिशेने तपास करत नाहीत. त्यामुळे ही तपास यंत्रणा बदलून मिळावी, अशी आमची मागणी आहे. या प्रकाराविरोधात आणि आमच्या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay high Court) याचिका दाखल करणार आहे. ही याचिका उद्या बुधवारी (ता. 20) करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vinod Ghosalkar
Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; काय आहे प्रकरण?

माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार झाला आहे. घोसाळकरांचे जुने मित्र मॉरिस नरोन्हा याने जुन्या वदातून हा गोळीबार केला. गोळीबारापूर्वी अभिषेक आणि मॉरिस नरोन्हाने फेसबुक लाइव्ह केले होते. त्यानंतर मॉरिस उठला आणि त्याने अभिषेक यांच्यावर गोळीबार केला. यात अभिषेक यांना चार गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

आता अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिस योग्य दिशेने तपास करत नसल्याचा आरोप विनोद घोसाळकरांनी केला आहे. सरकार सहकार्य करत नसून तपास यंत्रणांही दबावाखाली काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. हत्येचा तपास योग्य दिशेने होत नसल्याने तपास यंत्रणा बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी ते उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. विनोद घोसाळकरांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R

Vinod Ghosalkar
Lok Sabha Election 2024 : नूपुर शर्मा रायबरेली जिंकून देणार? वरुण गांधींच्या जागी राहुल गांधींच्या मित्राची चर्चा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com