Supreme Court of India, Shivsena  today news updates, Eknath Shinde News in Marathi
Supreme Court of India, Shivsena today news updates, Eknath Shinde News in Marathi Sarkarnama
देश

महाराष्ट्रतील सत्तासंघर्ष 'जैसे थे' राहणार; सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारस्थापनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) आज (11 जुलै) सुनावणी होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. त्यावर शिवसेनेच्यावतीने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे प्रकरण घटनात्मकदृष्ट्या महत्वाचे असल्याने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची स्थिती जैसे थे राहणार आहे. (Supreme Court Latest Marathi News)

शिवसेना (Shiv Sena) व शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणीसाठी स्वतंत्र घटनापीठ नेमले जाणार आहे. या याचिकांवर निकाल लागेपर्यंत 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. घटनापीठ नेमण्यास उशीर होणार असल्याने उद्याही याचिकांवर सुनावणी होणार नाही. त्यामुळे सुनावणी लांबणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे.(Shivsena today's news updates)

शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी विनंती केली होती. पण न्यायालयाने ही विनंती मान्य केली नाही. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. पण याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशामुळे शिंदे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. (Maharashta Political Update)

शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाने राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार अन्य पक्षात प्रवेश न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य ठरवावे, या प्रमुख मागण्यां शिवसेनेने आपल्या याचिकेत केल्या होत्या. तर अपात्रतेच्या नोटीशींना आव्हान देणाऱ्या व अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.

या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठाने ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपून नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी (१० जुलै) जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नव्हता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT