Doctors
Doctors  sarkarnama
देश

डॉक्टरांना मोठा झटका : रुग्णांना 'ग्राहक संरक्षण कायद्याचे' कवच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देशभरातील डॉक्टरांना मोठा झटका दिला आहे. शेतकरी, विद्यार्थी, विद्यूत, विमा, बँका, पतसंस्था, प्रवासी या क्षेत्रांप्रमाणे आता वैद्यकीय सेवेलाही (Medical Service) सर्वोच्च न्यायालयाने ग्राहक संरक्षण कायद्याचे कवच बहाल केले आहे. याचा अर्थ रुग्णांना डॉक्टरांकडून देण्यात येणारी आरोग्य आणि रुग्ण सेवा ही 'ग्राहक संरक्षण कायदा अर्थात कंझ्यूमर प्रोटेक्शन एक्ट' (Consumer Protection Act) मध्ये येत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

यानुसार रुग्ण त्याला योग्य सेवा मिळाली नाही अथवा आपली फसवूणक झाली आहे, असे वाटतं असल्यास संबंधित डॉक्टरांविरोधात अथवा हॉस्पिटलविरोधात ग्राहक म्हणून न्यायमंचात तक्रार दाखल करू शकणार आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालानेही अशाच प्रकारचा निर्णय दिला होता. डॉक्टरांद्वारे प्रदान करण्यात येणारी रुग्ण आणि आरोग्य सेवा ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या कक्षेत येत असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.

मात्र या आदेशाविरुद्ध मेडिको लीगल अॅक्शन ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत रुग्ण डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकत नाही, असा दावा करत मेडिको लीगल अॅक्शन ग्रुपने या आदेशाला आव्हान दिले होते. यावर निकाल देत सर्वोच्च न्यायलयाने मेडिको लीगल अॅक्शन ग्रुपची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली. या निकालात न्यायालय म्हणाले, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा १९८६ चा कायदा रद्द करून बनवण्यात आला आहे. मात्र केवळ जुना कायदा रद्द करून नवीन कायदा आणला म्हणून डॉक्टरांनी दिलेली आरोग्य आणि रुग्ण सेवा सेवेच्या व्याख्येबाहेर काढता येणार नाही. आरोग्य सेवा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवायची असल्यास संसदेने याबाबत कायद्यात दुरुस्ती करुन याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे, असेही सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT