राज ठाकरेंच्या सभेला मनसैनिकांना मिळणार हिंदु संघटनांची ताकद

Raj Thackeray | Aurangabad | : १ मे रोजी औरंगाबादला ऐतिहासिक सभा होणार असल्याचा दावा
MNS| Raj Thackeray|
MNS| Raj Thackeray|sarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला आता पोलिसांकडूनही अखेर परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सभेपूर्वीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच या सभेला मनसैनिकांसोबत इतरही हिंदू संघटना औरंगाबादच्या सभेत सहभागी होणार असल्याचा दावा मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिंगळे यांनी केला आहे.

समीर थिंगळे म्हणाले, महाराष्ट्र दिनाला राज ठाकरेंची सभा देशाच्या जडणघडणीमध्ये दिशा देणारी असून या सभेला पुण्याच्या ग्रामीण भागातील गावा-गावांमधून हजारोंच्या संख्येने तरुण सभेत सहाभागी होणार आहेत. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असुन ते उद्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानस्थळ वढु येथे नतमस्तक होणार आहेत. त्यानंतर किल्ले शिवनेरीत कार्यकर्तेच्या सन्मान सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.

भीम आर्मीची आक्रमक भूमिका :

याचवेळी भीम आर्मीने (Bhim Army) या सभेला उपस्थित राहण्याची घोषणा करत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच, सभेला परवानगी देताना पोलिसांनी घातलेल्या अटी आणि नियमांचे पालन न केल्यास सभा बंद पाडू, असा थेट इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. जातीय तेढ व धार्मिक भावना भडकावणारे भाषण करू नये, असे पोलिसांनी बजावले आहे. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी करू नये, असेही पोलिसांनी म्हटले आहे. याचबरोबर कोणीही शस्त्रे, तलवारी अथवा स्फोटके जवळ बाळगू नयेत, असेही पोलिसांनी बजावले आहे.

याबाबत बोलताना भीम आर्मीचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक कांबळे म्हणाले की, पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झाल्यास आम्ही सभेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देऊन सभा बंद पाडू. यासाठी सगळ्या महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. आम्ही सभेत नियमांचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवून असू.

MNS| Raj Thackeray|
आघाडी सरकार पडून वर्षभरात फडणवीस मुख्यमंत्री! चंद्रकांतदादांचं मोठं भाकीत

राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे या सभेसाठी सुमारे अडीच हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. दरम्यान, परवानगी मिळाली नाही तरी सभा घेण्यावर मनसे ठाम असल्याने पोलिसांनी देखील संघर्ष टाळत संयमाची भूमिका घेतली आहे. मनसे नेत्यांनी आधी काल स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांची महत्वाची बैठकही पार पडली होती.

MNS| Raj Thackeray|
पीएसआय भरती गैरव्यवहारातील भाजप नेत्याच्या घरी गृहमंत्र्यांनी झाडली पायधूळ!

राज ठाकरे यांची सभा १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी होत आहे. ३ मे रोजी रमजान सण असल्याने या सभेतून कुठल्याही प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले जाऊ नये, याकडे पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. सभेला काही कडक अटी-शर्ती घालूनच परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी कुठलाही अनुचित प्रकार सभेदरम्यान किंवा त्यानंतर घडू नये, यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. या सभेच्या बंदोबस्तासाठी 8 पोलीस उपायुक्तांसह अन्य अधिकारी व दोन हजार पोलीस कर्मचारी असा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com