Supreme Court, Rhea Chakraborty Sarkarnama
देश

Sushant Singh Rajput : मोठी किंमत चुकवावी लागेल! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला दणका

Maharashtra Government Supreme Court CBI Rhea Chakraborty : सीबीआय आणि महाराष्ट्र सरकारने रिया चक्रवर्तीच्या बाजूने मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान केले होते.

Rajanand More

New Delhi News : सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकार व सीबीआयला दणका दिला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबियांविरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. ही नोटीस रदद् करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात सीबीआयसह सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

सुप्रीम कोर्टात शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ही याचिका फेटाळून लावण्यात आली. तसेच मुंबई हायकोर्टाचा निकालही कायम ठेवला. या सुनावणीदरम्यान कोर्टाने सरकारसह सीबीआयलाही धारेवर धरले. रिया चक्रवर्ती या हायप्रोफाईल असल्याने हायकोर्टाच्या निकालाला आव्हान दिल्याचा ठपका कोर्टाने ठेवला.

सीबीआयने 2020 मध्ये रियासह भाऊ शोविक, आई संध्या आणि वडील इंद्रजीत च्रकवर्ती यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी सरकार आणि सीबीआयला चांगलेच धारेवर धरले. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

कोर्टाने म्हटले की, आम्ही तुम्हाला ताकीद देत आहोत. आरोपींमध्ये एक हायप्रोफाईल व्यक्ती असल्याने ही आव्हान याचिका दाखल केली आहे. ही याचिका फेटाळली जाईल. दोन्ही व्यक्तींची पाळेमुळे समाजात खोलवर रुजली आहेत. तुम्हाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे कोर्टाने ठणकावले.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत हे 14 जून 2020 रोजी बांद्रा येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. रिया आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांत आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यानंतर 2020 मध्ये सीबीआयने रियासह कुटुंबाविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणही चांगलेच तापले होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT