Jharkhand Assembly Election: मुख्यमंत्री पती अन् आमदार पत्नी एकाचवेळी निवडणुकीच्या रिंगणात; ही जोडी इतिहास रचणार?

NDA vs INDIA Alliance Face-Off in Jharkhand: झारखंडमध्य एनडीए विरुध्द इंडिया आघाडी अशी थेट लढत होत आहे.
Hemant Soren, Kalpana Soren
Hemant Soren, Kalpana SorenSarkarnama
Published on
Updated on

Ranchi News : झारखंड विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एनडीए विरुध्द इंडिया आघाडी अशी थेट लढत होत आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या आमदार पत्नी कल्पना सोरेन एकाचवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे दोघांसाठीही ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.

मागील वर्षभरात झारखंडमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहे. यापाश्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. हेमंत सोरेन यांनी शुक्रवारी बरहेट मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांच्या पत्नी कल्पना यांनी गांडेय मतदारसंघातून पुन्हा आपले नशीब आजमावणार आहेत.

Hemant Soren, Kalpana Soren
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News : ओबीसी उमेदवारांसाठी राहुल गांधी आग्रही

सोरेन कुटुंबातील पती-पत्नी एकाचवेळी निवडणूक रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. कल्पना यांच्या राजकारणातील एन्ट्रीआधी अनेक घडामोडी घडल्या. लोकसभा निवडणुकीआधी हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. त्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर चंपई सोरेन मुख्यमंत्री बनले.

हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक होणार, याची चर्चा अनेक दिवस आधीपासून होती. त्यामुळे कल्पना सोरेन मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, असेही तर्कवितर्क लढवले जात होते. पण चंपई सोरेन यांच्या गळ्यात या पदाची माळ टाकण्यात आली. त्यानंतरही कल्पना सोरेन यांनी गांडेय मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवली आणि विजयी झाल्या.

Hemant Soren, Kalpana Soren
Sanjiv Khanna Next CJI : चंद्रचूड यांचा 'उत्तराधिकारी' ठरला; देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड

हेमंत सोरेन यांच्या अनुपस्थितीत कल्पना सोरेन यांनी विरोधकांचे आरोप परतावून लावण्यासाठी जोरदार किल्ला लढवला. आता पुन्हा एकदा त्या विरोधकांना धूळ चारण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. पण यावेळी पती हेमंत सोरेन यांच्यासोबत त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने ही निवडणूक दोघांसाठीही वेगळी ठरणार आहे.

सोरेन पती-पत्नी दोघेही विजयी झाल्यास झारखंडमध्ये इतिहास घडणार आहे. पती-पत्नी एकाचवेळी विधानसभेत जातील. इंडिया आघाडीची पुन्हा सत्ता आल्यास हेमंत सोरेन हेच मुख्यमंत्री असतील. तर कल्पना यांच्या खांद्यावरही सरकारमध्ये मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते. त्यामुळे या दोघांसह राज्यात कुणाची सत्ता येणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com