New Delhi : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील 17 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जेलमधून बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयने त्यांना जवळपास दीड वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हापासून त्यांनी जामीनासाठी अनेकदा प्रयत्न केले. अखेर शुक्रवारी सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने दहा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथ यांच्या खंडपीठासमोर सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली होती. खंडपीठाने 6 ऑगस्ट रोजी निकाल राखून ठेवला होता. दिल्ली हायकोर्टाने सिसोदिया यांचा जामीन नाकारल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक करण्यात आली होती. हायकोर्टाने यावर्षी 21 मे रोजी त्यांचा जामीन नाकारला होता. सिसोदिया यांनी पदाचा दुरुपयोग केला होता. जामीनावर बाहेर आले तर ते साक्षीदार आणि पुराव्यांवर प्रभाव टाकू शकतात, अस कोर्टाने त्यावेळी म्हटले होते.
सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करताना हायकोर्ट आणि ट्रायल कोर्टाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शिक्षा म्हणून जामीन नाकारला जाऊ शकत नाही. जामीन हा एक नियम आणि आणि जेल एक अपवाद, हे न्यायालयांनी समजून घेण्याची वेळ आता आली आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच कोर्टाने त्यांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची परवानगीही दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.