Supreme Court Sarkarnama
देश

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा SC आरक्षण, संरक्षणाबाबत महत्वपूर्ण निकाल; धर्मांतर केल्यास पाणी सोडावे लागणार...

SC status after conversion india : केवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असून फरक पडत नाही. ख्रिश्चन धर्मात जातीव्यवस्था मानली जात नाही. त्यामुळे त्यांचा एससीचा दर्जा समाप्त होतो, असे कोर्टाने स्पष्ट केले.

Rajanand More

SC/ST act eligibility : सुप्रीम कोर्टाने मंगळवारी अनुसूचित जाती (SC) च्या दर्जाबाबत महत्वपूर्ण निकाल दिला. केवळ हिंदू, शीख आणि बौध्द धर्मातील लोकांनाच एससीचा दर्जा प्राप्त असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. या तीन धर्मांतील व्यक्तीने अन्य दुसऱ्या धर्मात धर्मांतर केल्यास त्या व्यक्तीला एससीचे लाभ मिळू शकत नाहीत, असेही कोर्टाने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. कोर्टाने स्पष्ट केले की, तीन धर्मांव्यतिरिक्त अन्य धर्मात धर्मांतर केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येतो. त्यामुळे त्याला आरक्षण किंवा कायद्याचे संरक्षण मिळत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

धर्मांतरित व्यक्तीला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाचे संरक्षणही मिळू शकत नाही. कारण हिंदू, शीख आणि बौध्द धर्माव्यतिरिक्त अन्य धर्मात धर्मांतर केल्याने तो व्यक्ती अनुसूचित जातीचा राहत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण?

आंध्र प्रदेशातील एक पादरी चिंथाडा आनंद यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या एका अपिलावर हा निकाल देण्यात आला आहे. आनंद यांनी आरोप केला होता की, अक्काला रामीरेड्डी आणि अन्य लोकांनी त्यांसोबत जातीवर आधारित भेदभाव केला तसेच शिवीगाळ केली. त्यांच्या या आरोपांनंतर पोलिसांनी संबंधितांवर एससी-एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

रामिरेड्डी यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टात ही एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल केली. हायकोर्टाने एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने आनंद यांचा एससीचा दर्जा संपुष्टात आला आहे. त्यामुळे केवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असून फरक पडत नाही. ख्रिश्चन धर्मात जातीव्यवस्था मानली जात नाही. त्यामुळे त्यांचा एससीचा दर्जा समाप्त होतो. त्यामुळे संबंधित कायद्याचे संरक्षणही मिळू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले होते.

आनंद यांनी हायकोर्टाच्या या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल योग्य ठरविला. संविधानात अनुसूचित जातीचा दर्जा प्रामुख्याने हिंदू, शीख आणि बौध्द धर्मांपुरताच मर्यादीत आहे. अन्य धर्मांमध्ये धर्मांतर केल्यानंतर संबधित व्यक्ती सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण या आरक्षण आणि संरक्षणासाठीच्या लाभांपासून बाहेर पडतो, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT