Justice M. R. Shah is retiring today News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात निकाल दिला. या घटनापीठात समावेश असणारे न्यायमूर्ती एम. आर. शाह (M. R. Shah) आज निवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना शाह यांनी मोठी घोषणा केली.
शाह यांच्या निवृत्तीमुळेच महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा निकाल १५ मेच्या आत लागणार अशी अटकळ बांधली जात होती. त्यानुसार हा निकाल ११ मे रोजी जाहीर झाला. न्यायमूर्ती शाह निवृत्त होत असताना त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीचे संकेत दिले. त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कामकाजादरम्यान केलेल्या भाषणात त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
न्यायमूर्ती शाह यांनी या भाषणात आपण निवृत्त होणाऱ्यांमधले नसल्याचे म्हटले आहे. ''मी निवृत्त होणाऱ्यांमधला नाही आहे. मी माझ्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी अशी प्रार्थना करतो की मला या नव्या इनिंगसाठी ईश्वर शक्ती देवो''.
न्यायमूर्ती शाह यांनी यावेळी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले ''माझ्या कार्यकाळात जर मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून ते जाणूनबुजून झालेले नसल्याचेही त्यांनी सांगितले. मी नेहमीच माझ्या कामाची पूजा केली. तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेमामुळे मला भरून आले. मी बार आणि रजिस्ट्रीच्या सर्व सदस्यांचाही आभारी आहे. माझ्या सपोर्ट स्टाफ आणि माझ्या निवासस्थानावरील कर्मचारी वर्गाचाही मी आभारी असल्याचे शाह यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.