Uddhav Thackeray News: ''मोदी-शाहांच्या भाजपचा कर्नाटकमधील पराभव हा देशासाठी शुभशकुन...''; ठाकरे गटाचा तिखट वार...

Maharashtra Politics : "बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली...''
Modi Government, Uddhav Thackeray
Modi Government, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai : कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेसच्या पारड्यात कानडी जनतेनं मतांचं भरघोस दान टाकलं आणि सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. २२४ जागांपैकी काँग्रेसनं तब्बल १३५ जागा जिंकल्या तर दुसरीकडे मागील निवडणुकीतील आकडाही भाजपला गाठता आला नाही. ४० जागांचा फटका बसत अवघ्या ६६ जागांवर समाधान मानावं लागलं. या दारूण पराभवानंतर भाजपसह मोदी शाह यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. याचवेळी ठाकरे गटानंही भाजपा आणि मोदी सरकारवर कर्नाटकच्या निकालावरून हल्लाबोल केला आहे.

शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे)चं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी कर्नाटकचा निकाल मोदी-शहांच्या विरोधात गेला. कानडी जनतेने मोदी-शहांच्या भाजपचा मोठा पराभव केला. हा देशासाठी शुभशकुन आहे व त्यासाठी कानडी जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच असल्याचं म्हटलं आहे. तसेच काँग्रेस(Congress) पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप 66 या आकडय़ावरच लटकला. कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारून भाजपकडून दक्षिणेतले एकमेव राज्य हिसकावून घेतले. देशात 2024 साली काय घडेल याचे दिशादर्शन कानडी जनतेने केले आहे.

Modi Government, Uddhav Thackeray
Lakhandur Market Committee: पटोलेंना 'होमपीच'वरच खिंडीत गाठण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादीला सोबत घेतलं,तरीही काँग्रेसनं मैदान मारलंच..!

"...ती गदा मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली!''

"बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे. पुन्हा भाजपने चालविलेले ‘ऑपरेशन लोटस’देखील कर्नाटकातील जनतेने चिरडून टाकले. भाजप(BJP)ने सत्तेसाठी फोडलेल्या 18 आमदारांपैकी बहुतेकांना जनतेने आता घरी बसविले आहे. भारतातील सामान्य जनता हुकूमशाहीचा पराभव घडवू शकते, हा कर्नाटकच्या निकालाने दिलेला धडा आहे. कर्नाटकची जनता शहाणी आहे. हाच शहाणपणाचा संदेश आता देशभरात गेल्याशिवाय राहणार नाही! कर्नाटकात खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन लोटस’ झाले आहे. राष्ट्रीय पातळीवरही तेच होईल" असं देखील म्हटलं आहे.

कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव ठरलेलाच...

याचवेळी कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव ठरलेलाच होता. मोदी-शहांनी कितीही उसने अवसान आणून ‘जितंमय्या’चा आव आणला तरी त्यांची हवा कर्नाटकच्या जनतेने काढून घेतली असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. मोदी व शहांचा प्रचार व त्यांची भाषणे म्हणजे राजकीय थिल्लरपणाच होता. मोदी-शहा या जोडगोळीने आधी ‘हिजाब’चा विषय चालवला, तो फसला. काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदीची भाषा करताच मोदी(Narendra Modi) वगैरेंनी हा बजरंग बलीचा अपमान आहे अशी बोंब ठोकून प्रचारात बजरंगबलीस उतरवले.

Modi Government, Uddhav Thackeray
Ahmednagar Violence: संभाजी महाराजांच्या मिरवणुकीत दोन गटात तुफान राडा; अकोला पाठोपाठ अहमदनगरमध्ये हिंसाचार

हा मोदी या 'विकास पुरुषा'चा पराभव...

काँग्रेसनं बजरंगबलीचा अपमान केला म्हणून भाजपास विजयी करा, असे सांगणे हा मोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव आहे. मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चालिसासारखे कार्यक्रम करायला लावले. या सगळय़ाचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवल्याचं ठाकरे गटानं म्हटलं आहे.

Modi Government, Uddhav Thackeray
Karnataka CM Posters: कर्नाटकात CM पदावरुन पोस्टर वॉर सुरु : डी.के. शिवकुमार अन् सिद्धरामय्या यांच्या..

पराभवाचे मडके फोडण्यासाठी बिच्चारे...

कर्नाटकचे चित्र कधी नव्हे इतके स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे बहुमत इतके पक्के आहे की, भारतीय जनता पक्ष तेथे फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्नदेखील आता पाहू शकत नाही. महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून आणण्याची कुवतही कर्नाटकातील भाजपात नाही. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष नड्डा यांना पराभवामागून पराभवाचे धक्के बसत आहेत व त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. कर्नाटकात भाजपने विजय मिळवला असता तर त्याचे श्रेय मोदी यांनीच घेतले असते,पण पराभवाचे मडके फोडण्यासाठी बिच्चारे नड्डा यांचे डोके आहे”, अशी खोचक टीकाही यामाध्यमातून करण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com