A lawyer allegedly attempted to throw a shoe toward Chief Justice BR Gavai inside the Supreme Court. Sarkarnama
देश

CJI Bhushan Gavai : धक्कादायक बातमी : सरन्यायाधीश गवईंवर कोर्टातच हल्ल्याचा प्रयत्न, सुनावणीदरम्यानच घडला प्रकार

Lawyer Attempts to Hurl Shoe at Chief Justice BR Gavai in Courtroom : काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांनी खजुराहो येथील एका पुरातन मंदिरातील भगवान विष्णुच्या सात फूट उंच मुर्तीच्या पुनर्स्थापनेबाबत टिप्पणी केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता.

Rajanand More

Supreme Court incident : सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान सोमवारी धक्कादायक प्रकार घडला. एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने मोठा गोंधळ उडाला. संबंधित वकिलाला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ‘सनातन धर्म का अपमान नही सहेगा हिंदूस्तान’ अशा घोषणा या वकिलाने दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

सुप्रीम कोर्टाचे कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या सत्रातच सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली होती. याचवेळी समोर जात संबंधित वकिलाने घोषणा देत सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काही वकिलांनी केला.

संबंधित वकिलाला पोलीस कोर्टातून बाहेर नेत असताना सनातन धर्माचा अपमान हिंदूस्तान सहन करणार नाही, अशा घोषणा त्याने दिल्या. हा प्रकार घडत असताना सरन्यायाधीश गवई मात्र शांत होते. व्यक्तीला कोर्टातून बाहेर नेल्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले. कोर्टात उपस्थित इतर वकिलांना ते म्हणाले, ‘या सगळ्यावर लक्ष देऊ नका. आम्हाला फरक पडत नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.’ दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कोर्ट परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

घटनेनंतर एका वकिलाने मीडियाशी बोलताना सांगितले की, आजची घटना खूपच दुर्दैवी आहे. कोर्टात एका वकिलाने जर असा प्रकार केला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या बारचे ते सदस्य आहेत. आम्ही चौकशी केली असता ते २०११ पासूनचे सदस्य आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

संबंधित वकिलाने सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न का केला याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांनी खजुराहो येथील एका पुरातन मंदिरातील भगवान विष्णुच्या सात फूट उंच मुर्तीच्या पुनर्स्थापनेबाबत टिप्पणी केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. ही याचिका फेटाळताना ते म्हणाले होते की, जा आणि देवालाच काहीतरी करण्यासाठी सांगा. तुम्ही भगवान विष्णुचे कट्टर भक्त असल्याचे सांगता. मग आता जा आणि प्रार्थना करा. हे एक पुरातन स्थळ आहे आणि एएसआयला परवानगी द्यावी लागेल.

सरन्यायाधीश गवईंच्या टिप्पणीनंतर वाद निर्माण झाल होता. सोशल मीडियात त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यावर सरन्यायाधीशांनी मी सर्व धर्मांचा सन्मान करतो, असे सांगितले होते. सरन्यायाधीश गवईंनी केलेल्या टिप्पणीमुळे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT