Rajan Teli News : ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेलेल्या राजन तेलींचा 4 दिवसांतच धमाका; पहिला वार थेट राणेंवर...

Rajan Teli’s Allegation Against Nitesh Rane : राजन तेली यांनी थेट मंत्री राणेंना टार्गेट केल्याने कोकणात पुन्हा तेली विरुध्द राणे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे.
Rajan Teli alleging Nitesh Rane’s involvement in the Sindhudurg District Bank loan scam.
Rajan Teli alleging Nitesh Rane’s involvement in the Sindhudurg District Bank loan scam.Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg District Bank Loan Scam : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर चारच दिवसांत तेलींनी कोकणात धमाका केला आहे. शिंदेसेनेत प्रवेश करताच त्यांनी पहिला वार थेट राणेंवर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार मंत्री नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर यांनी कथित घोटाळ्याप्रकरणी तेली यांच्यासह आठ जणांची दिल्लीतील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे तक्रार केली आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठीच तेली यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आला कोकणात रंगली आहे. या चर्चा झडत असतानाच तेली यांनी नितेश राणेंनाही कथित घोटाळ्यात ओढले आहे.

बँकेच्या अवैध कर्ज वाटपाच्या घोटाळ्यात मुख्य सुत्रधार मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हेच असल्याचा आरोप करत तेली यांनी कर्जवाटपाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे केली. राणे हे बँकेचे संचालक असून त्यांनी अध्यक्ष व सीईओंवर दबाव टाकून मोठ्या रकमांचे कर्जवाटप केले. याबाबतच्या तक्रारी नाबार्डसह सहकार निबंधक व स्थानिक पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. पण त्याची दखल घेण्यात आली नाही.

Rajan Teli alleging Nitesh Rane’s involvement in the Sindhudurg District Bank loan scam.
घरातून निघताना अब्जाधीश अंबानींच्या खिशात किती असते कॅश, क्रेडिट कार्ड्स? वाचून बसेल धक्का...

बँकेतून कामगारांना तब्बल आठ कोटींपर्यंतचे कर्ज देण्यात आले. कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना कर्जाचे वाटप झाल्याचा आरोप तेलींनी केला आहे. केवळ राजकीय सुडापोटी आपल्याला अडकविण्यात आल्याचा आरोप करत तेलींनी खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे शिंदे सेनेतच नितेश राणे यांचे बंधू आमदार निलेश राणे हेही आहेत. त्यामुळे महायुतीसह शिंदे सेनेतही वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

Rajan Teli alleging Nitesh Rane’s involvement in the Sindhudurg District Bank loan scam.
Hasan Mushrif News : ZP, नगरपालिका निवडणुकीआधी भाजपचा मुश्रीफांवर घाव; प्रवीणसिंह पाटलांनी साथ सोडली...

पुढील काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यापार्श्वभूमीवर तेली यांनी शिंदेंना साथ दिल्याने ठाकरेंना धक्का बसला आहे. मात्र, तेली यांनी थेट मंत्री राणेंना टार्गेट केल्याने कोकणात पुन्हा तेली विरुध्द राणे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. यामध्ये तेलींच्या आरोपांनंतर निलेश राणे काय भूमिका घेणार, याकडे कोकणातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com