New Delhi : सुप्रीम कोर्टासाठी मोठी बातमी समोर आली आहे. कोर्टाचे यू-ट्यूब चॅनेल हॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या चॅनेलवर क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी हा प्रकार समोर आल्याने थेट सुप्रीम कोर्टाच्या डाटाबेसच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या यू-ट्यूब चॅनेलवरून प्रामुख्याने काही महत्वाच्या प्रकरणांचे थेट प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे हे चॅनेल महत्वाचे मानले जाते. हॅकर्सकडून हे चॅनेल हॅक करून न्यायव्यस्थेच्या सुरक्षेलाच एकप्रकारे आव्हान देण्यात आले आहे. हॅकर्सने या चॅनेलवर क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्हिडिओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडिओ अमेरिकेतील रिपल लॅबचे असल्याचे समोर आले आहे.
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी आता रिपल या नावाने चॅनेल दिसत आहे. या चॅनेलवर आधी कोर्टाशी संबंधित सुनावण्यांचे व्हिडिओ दिसत होते. आता त्यावर क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्हिडिओ दिसत असल्याचे पाहायला मिळाले. कोर्टाने या चॅनेलवरून नुकतीच कोलकात रेप व मर्डर प्रकरणावरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण केले होते.
सुप्रीम कोर्टाच्या जुन्या व्हिडिओला हॅकर्सने आता प्रायव्हेट केले आहे. त्यामुळे हे व्हिडिओ दिसत नाहीत. कोर्ट प्रशासनाकडून याचा तपास सुरू करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, कोर्टाने काही वर्षांपूर्वी काही प्रकरणाची सुनावणी यू-ट्यूब चॅनेलवरून लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कोर्टाने संविधानातील कलम 21 चा आधार घेतला होता.
दरम्यान, चॅनेल हॅक झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट प्रशासनाने हे चॅनेल तात्पुरते बंद करत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लवकरच चॅनेल पुन्हा सुरू केले जाईल, असेही प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.