Jaya Amitabh Bachchan : जया बच्चन यांचा संसदेत भडका अन् आडनाव न लावण्यास अमिताभ यांचे समर्थन; काय आहे कनेक्शन?

Jaya Bachchan Parliament Jaya Bhaduri : संसदेत जया अमिताभ बच्चन असे नाव घेतल्याने वाद निर्माण झाला होता. जया बच्चन सभापतींवर भडकल्या होत्या.
Amitabh Bachchan, Jaya Bachchan
Amitabh Bachchan, Jaya BachchanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यावरून सरकार आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले होते. हा वाद थंडावला असला तरी आता जया बच्चन यांच्या संतापामागचे कनेक्शन समोर आले आहे.

अमिताभ बच्चन यांच्याशी विवाह झाल्यानंतरही चित्रपटांमध्ये त्यांचे आडनाव न लावण्यावर त्या ठाम होत्या. जया भादुरी असेच, त्यांचे नाव पडद्यावर झळकत असते. विशेष म्हणजे, याबाबतीत अमिताभही त्यांच्या बाजूने उभे राहिले. याचे आणि संसदेतील वादाचे थेट कनेक्शन आहे.

Amitabh Bachchan, Jaya Bachchan
Sanatan Dharma : सनातन धर्माच्या रक्षणासाठी मोदी ‘हा’ निर्णय घेणार का? मित्रपक्षाच्या मागणीने चर्चांना उधाण

संसदेतही नावावरूनच वाद झाला होता. राज्यसभेत सभापतींनी जया अमिताभ बच्चन असा पुकारा केला होता. त्यावर जया बच्चन यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. ‘महिला आपल्या पतीच्या नावाने ओळखल्या जाणार, हे असेच आहे. त्यांचे काहीच अस्तित्व नाही. त्यांनी काहीच कमावलेले नाही,’ अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. हा वाद चांगलाच गाजला होता.

आता जया बच्चन यांचे वडील तरुण कुमार भादुरी यांचा एक जुना लेख सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटांच्या पोस्टवर जया यांच्या नावासमोर आपले नाव न लावण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते, असे या लेखात म्हटले आहे.

Amitabh Bachchan, Jaya Bachchan
Tirupati Balaji Temple : तिरुपतीच्या प्रसादात जनावरांची चरबी; चंद्राबाबूंचा जगनमोहन यांच्यावर सर्वात मोठा वार

1989 मध्ये द इलस्ट्रेटेड विकलीमध्ये हा लेख प्रसिध्द झाला होता. या लेखात लिहिले आहे की, मला एक घटना आठवते. विवाहानंतर जया एक चित्रपट करत होती. त्याचे पोस्टर आले तेव्हा त्यावर केवळ जयाचे विवाहापूर्वीचेच जया भादुरी हे नाव होते. त्यानंतर एकाने अमिताभ यांना विचारले की, असे का लिहिले आहे. त्यांच्या नावामागे बच्चन हे आडनाव असायला हवे. त्यावर अमिताभ यांनी उत्तर दिले होते, त्या बच्चन आहेत. पण तुम्हाला माहिती असायला हवे की, इंडस्ट्रीमध्ये आणि व्यावसायिकदृष्ट्या त्या जया भादुरी म्हणून खूप प्रसिध्द आहेत.

अमिताभ बच्चन यांनीही त्यावेळी जया यांच्या आपल्या नावासमोर बच्चन हे आडनाव न लावण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. संसदेत आपल्या नावासमोर अमिताभ बच्चन या नावाचा पुकारा झाल्यानंतर जया बच्चन यांचा भडका उडण्याचे आणि अमिताभ यांच्या समर्थनाचे हे कनेक्शन असल्याचे आता समोर आले आहे.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com