Supreme Court rejected Kejriwals plea : पंतप्रधान मोदींच्या शिक्षणाबाबत प्रश्न उपस्थित करणारे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. गुजरातमधील विद्यापीठाने केजरीवालांविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. तर यासंदर्भातील कार्यावाहीला स्थगिती देण्यासाठी केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जिथे त्यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान दिले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयातही केजरीवालांच्या पदरी निराशाच आली आणि त्यांची याचिका फेटाळली गेली.
न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती एसवीएन भट्टी यांच्या खंडपीठाने सांगितले की, आम्ही अशाचप्रकारच्या टिप्पणी संदर्भात आम आदमी पार्टीचे(AAP) नेते संजय सिंह यांची अशाचप्रकारची याचिका फेटाळलेली आहे. केजरीवालांनी कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला आव्हान देत, सुनावणीस स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती. गुजरात उछ्च न्यायालयानेही केजरीवालांची मागणी फेटाळली होती.
एप्रिय 2024मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याच प्रकरणात आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांची मागणी फेटाळलेली आहे. गुजरात विद्यापीठाचे रजिस्ट्रार पीयूष पटेल यांनी अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांच्या टिप्पणींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
यावर गुजरात उच्च न्यायालयाकडून केजरीवालांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयास केजरीवालांवी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांची मागणी आहे की, याप्रकरणी त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यास स्थगिती दिली जावी.
वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अरविंद केजरीवाल यांचे प्रतिनिधित्व करताना, न्यायालयात युक्तिवाद केला की नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) विद्यापीठाच्या पदवीच्या पब्लिकेशनच्या संदर्भात केजरीवाल यांचा प्रश्न म्हणजे मानहानी नव्हता. सिंघवी यांनी सांगितले की, जर या प्रकरणात काही बदनामी असेल, तर स्वत: मोदींनी बोललं पाहीजे, गुजरात विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने नाही.
याप्रकरणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विद्यापिठाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी न्यायालयास सांगितले की, संजय सिंह यांच्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयाच्या मागील आदेशाचा हवाला दिला, तर सिंघवी यांनी या मुद्य्यावर जोर दिला की दोन्ही प्रकरणात केली गेलेली विधानं वेगळी आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.