Mahavikas Aghadi and Junnar Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जसजशी जवळ येतआहे. तसा महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा दिवसेंदिवस अधिकच क्लिष्ट होताना दिसत आहे. मतदारसंघांवर दावे केले जात असून, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. अशावेळी पक्षश्रेष्ठींची पदाधिकरी व कार्यकर्त्यांची समजूत काढताना चांगलीच दमछाक होत आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्येही याचा प्रत्ययत येत आहे. या ठिकाणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत, दोन दिवसांपूर्वी 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत वाटाघाटी शिवाय आम्हाला जुन्नर मतदारसंघ सोडण्याचा इशारा दिला होता.
यानंतर आज (सोमवारी) पुन्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नारायणगांव येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मतदारसंघावर दावा ठोकल्याने महाविकास आघाडीत तणाव वाढला आहे. एवढंच नाहीतर उद्या (मंगळवारी) प्रमुख पदाधिकारी पुन्हा 'मातोश्री' आणि शिवसेना(Shivsena) भवनाचे दार ठोठवणार आहेत.
नारायणगाव येथे झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीत(Mahavikas Aghadi) जुन्नरची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे अशी आक्रमक मागणी सर्वच पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच उमेदवारी मिळो किंवा न मिळो स्थानिक पातळीवर जोमाने काम करण्याच्या सूचना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
बैठकीला उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, तालुका समन्वयक प्रसन्न डोके, विधानसभा संघटक बाबू पाटे, तालुका समन्वयक बाबा परदेशी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्कर गाडगे, उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, उपतालुका प्रमुख बन्सीशेठ चतूर, शहरप्रमुख संतोष वाजगे, जुन्नर शहर प्रमुख समीर भगत शिवा खत्री आदि पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान काल (रविवार) तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी काही पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut), संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची भेट घेऊन मतदारसंघाची आणि मतदानाची सविस्तर आकडेवारी सादर करत, चर्चा केली. यावर ठाकरे यांनी आपण जुन्नर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेलाच घेणार असल्याचे आश्वस्त केल्याचे खंडागळे यांनी सांगितले.
दरम्यान प्रबळ दावेदार माऊली खंडागळे यांनी 'लढायला बळ द्या साहेब..' या आशयाचा बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेतचा फोटो शेअर करत भावनिक साद घातली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.