Supreme Court, Ranveer Allahbadia Sarkarnama
देश

Ranveer Allahbadia Case : त्याच्या डोक्यातच घाण भरली आहे! सुप्रीम कोर्टाची तळपायाची आग मस्तकात गेली...

Youtuber Case India got latent Supreme Court : रणवीर अलाहबादियाने एका शोमध्ये वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rajanand More

New Delhi News : यूट्यूब शोमध्ये वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या यूट्युबर रणवीर अलाहबादिया याच्यावर सुप्रीम कोर्टही चांगलेच भडकले. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्याच्या डोक्यातच घाण भरली असल्याचे विधान करत आपला संताप व्यक्त केला. तसेच त्याला अटक न करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

रणवीरने प्रसिध्द वकील अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याच्यावर मुंबईसह देशात अन्य काही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचिकावर कोर्टात आज सुनावणी झाली. त्याच्याविरोधात दाखल गुन्हे एकत्रित करण्याची विनंती कोर्टात करण्यात आली आहे. इंडियाज गॉट लॅटेंट या शोमध्ये त्याने पालकांविषयी अश्लील विधान केले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कोर्ट म्हणाले, तो ज्यापध्दतीने बोलला आहे, त्यावरून आम्ही त्याला काय मदत करू शकतो. प्रसिध्द झाला म्हणजे काहीही बोलण्याचा परवाना मिळाला आहे का? आई-वडिलांविषयी अश्लील बोलणे, हेच दाखवते की त्याच्या डोक्यातच घाण भरली आहे, असा संताप कोर्टाने व्यक्त केला. 

अलाहबादियाचे वकील चंद्रचूड यांनी कोर्टात सांगितले की, ‘याचिकाकर्त्याला धमकी मिळत आहे. त्याची जीब छाटणाऱ्याला बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.’ त्यावर कोर्ट म्हणाले, या व्यक्तीला चर्चेत राहण्याचा शौक आहे. जो धमकी देत आहे, त्यालाही असाच शौक असेल. रणवीस अलाहबादिया जे म्हणाले आहे, त्यामुळे आई-वडील, बहीण सर्वांनाच त्याची लाज वाटली असेल.

कोर्टाने संताप व्यक्त करतानाच अलाहबादियाला अटक न करण्याचे निर्देशही दिले. ठाणे, जयपूर आणि गुवाहाटीमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. तसेच या प्रकरणात इतर कुठेही गुन्हा दाखल केला जाऊ नये, असेही कोर्टाने म्हटले. या प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करावे आणि तपास अधिकारी बोलवतील तेव्हा हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने रणवीरला दिले आहेत.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT