Assembly Session Update : आमदाराने थेट विधानसभेत आणला अस्थिकलश; CM म्हणाले, पराभवाची खुन्नस...

Samajwadi Party MLA Ashutosh Sinha CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेश विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले.
MLA Ashutosh Sinha
MLA Ashutosh SinhaSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Assembly News : सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी विरोधकांकडून अनेक आरोप केले जातात. आंदोलनासाठी क्लुप्त्या लढवल्या जातात. एका आमदारानेही आज सरकारचा निषेध करण्यासाठी थेट अस्थिकलश विधानसभेत आणला. ही घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या आमदाराने हे अनोखे आंदोलन केले.

उत्तर प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. राज्याचे बजेट 20 फेब्रुवारीला सादर केले जाणार आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि भाजपमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरी, मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील कथित गडबड आदी मुद्द्यांवरून समाजवादी पक्षाकडून सत्ताधारी भाजपला घेरले जाऊ शकते.

MLA Ashutosh Sinha
Gyanesh Kumar : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची वर्णी, PM मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजूरी

भाजप आणि सपामध्ये वादाची ठिणगी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पडली. सपाचे आमदार आशुतोष सिन्हा हे आज सायकलवर विधानसभेत आले. त्यांनी त्यांच्यासोबत अस्थिकलशही आणला होता. त्यावर नैतिकतेचा अस्थिकलश असे लिहिले होते. हा अस्थिकलश लोकशाहीच्या मंदिरात ठेवणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितलले. महाकुंभचा मुद्दा अधिवेशनात मांडून सरकारला घेरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

योगींचा पलटवार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी विरोधकांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे केवळ सत्ताधारी पक्षाची जबाबदारी नाही. विरोधी पक्षाचेही काम आहे. पराभवाने निराश झालेले विरोधक सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणणार नाहीत, अशी अपेक्षा आह. पराभवाची खुन्नस सभागृहात काढणार नाही. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. पण त्यासाठी त्यांनी संसदीय मर्यादांचे पालन करायला हवे, असा टोलाही योगींनी लगावला.

MLA Ashutosh Sinha
Rahul Gandhi meeting : राहुल गांधी ज्या बैठकीसाठी मोदींच्या घरी गेले, त्याच बैठकीवर काँग्रेसने घेतला आक्षेप; काय घडलं?  

चेंगराचेंगरीचा मुद्दा गाजणार

अधिवेशनामध्य महाकुंभमधील चेंगराचेंगरीचा मुद्दा गाजणार असल्याचे स्पष्ट झाले. सकाळीच विरोधकांकडून विधानसभेबाहेर निदर्शने करण्यात आली. चेंगराचेंगरीमध्ये किती भाविकांचा मृत्यू झाला, याचा खरा आकडा सरकारकडून सांगितला जात नाही. हे आकडे लपवले जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. संसदेतही हा मुद्दा गाजला होता. आता उत्तर प्रदेश विधानसभेतही त्यावर गोंधळ होणार, हे स्पष्ट आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com