The Supreme Court of India issues a stay on UGC’s new regulations, raising concerns over ambiguous wording and potential misuse of education policies. Sarkarnama
देश

Supreme Court UGC stay : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा धक्का, युजीसीच्या नव्या नियमांबाबत दिले महत्त्वाचे आदेश

Supreme Court Stays UGC Rules : सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे युजीसीला मोठा धक्का बसला आहे. सुनावणीवेळी न्यायालयाने युजीसीने नियमात वापरलेल्या शब्दांवरून नियमाचा गैरवापर होऊ शकतो आणि आम्ही समाजात एक निष्पक्ष आणि समावेशक वातावरण निर्माण करण्याचा विचार करत आहोत, असं निरीक्षण नोंदवलं आहे.

Jagdish Patil

Supreme Court Stays UGC Rules : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) जारी केलेल्या नव्या नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.

युजीसीच्या नव्या नियमांत वापरलेल्या शब्दांवरून नियमाचा गैरवापर होऊ शकतो, असे निरीक्षणही सुप्रिम कोर्टाने नोंदवले आहे. युजीसीने केलेल्या नवीन तरतुदींविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रिम कोर्टाने स्थगितीचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे युजीसीला मोठा धक्का बसला आहे. तर या सुनावणीवेळी न्यायालयाने युजीसीने नियमात वापरलेल्या शब्दांवरून नियमाचा गैरवापर होऊ शकतो आणि आम्ही समाजात एक निष्पक्ष आणि समावेशक वातावरण निर्माण करण्याचा विचार करत आहोत, असं निरीक्षण नोंदवलं.

शिवाय जेव्हा ३ ई आधीच अस्तित्वात आहेत, तेव्हा २ सी कसे प्रासंगिक होतात? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. दरम्यान, यावेळी सरन्यायाधीशांनी २०१२ चे नियम पुन्हा लागू करण्याचा आदेश दिले. तर या प्रकरणावरील पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने १९ मार्च ही तारीख दिली आहे.

दरम्यान, युजीसीने नियमात वापरलेल्या शब्दांचा गैरवापर रोखण्यासाठी चौकशीची आवश्यकता असून सर्वोच्च न्यालयाने केंद्र सरकारला पुन्हा एकदा पुनर्लेखन करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत या निर्णयाचे कामकाज स्थगित केलं जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT