Ajit Pawar Funeral : अजित पवारांच्या अंत्ययात्रेदरम्यान अंगरक्षकांना अश्रू अनावर, काल लँडिंगपूर्वी दादांनी फोन करून विचारलं होतं, 'आला आहात ना...?'

Ajit Pawar Funeral Emotional Moments: अपघाताच्या वेळी अजित पवार यांचे दीर्घकाळीन अंगरक्षक महेश बोबडे आणि इम्तियाज मोमिन हे विमानतळ परिसरात उपस्थित होते. अजित पवार यांनी लँडिंगपूर्वीच फोनवरून सुरक्षारक्षकांना संपर्क करून "विमान लँड होत आहे, तुम्ही आला आहात ना?" असा प्रश्न विचारला होता.
Emotional moment as Ajit Pawar’s long-time bodyguards struggle to hold back tears during his funeral procession in Baramati, reflecting loyalty and loss.
Emotional moment as Ajit Pawar’s long-time bodyguards struggle to hold back tears during his funeral procession in Baramati, reflecting loyalty and loss.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 29 Jan : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यावर शोककळा पसरली आहे. काल सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खासगी विमानाला बारामती विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व ५ जणांचा मृत्यू झाला.

अपघाताच्या वेळी अजित पवार यांचे दीर्घकाळीन अंगरक्षक (एसपीयू) महेश बोबडे आणि इम्तियाज मोमिन हे विमानतळ परिसरात उपस्थित होते. अजित पवार यांनी लँडिंगपूर्वीच फोनवरून सुरक्षारक्षकांना संपर्क करून "विमान लँड होत आहे, तुम्ही आला आहात ना?" असा प्रश्न विचारला होता.

त्यांनतर काही क्षणांतच विमान धावपट्टीजवळच शेतात कोसळले. सुरुवातीला हे एखादे शिकाऊ विमान असावे असा समज झाला, मात्र GPS तपासल्यानंतर हे अजित पवार यांचे विमान असल्याचे निष्पन्न झाले. या धक्क्यातून दोघेही हादरले आणि तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की काहीच करता आले नाही.

Emotional moment as Ajit Pawar’s long-time bodyguards struggle to hold back tears during his funeral procession in Baramati, reflecting loyalty and loss.
Ajit Pawar reforms : महिलांपासून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल; अजितदादांनी घेतलेले काही क्रांतिकारक निर्णय

गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे अजित पवार यांच्या 'सावलीसारखे' साथीदार होते. आज अंत्ययात्रेच्या रथावर उभे राहिलेले महेश बोबडे आणि इम्तियाज मोमिन यांचे अश्रू अनावर झाले. "पोलिसांना भावना नसतात" हे वाक्य सहजतेने म्हटले जाते, पण या दोघांनी दाखवले की खोलवर मानवी भावना असतात. अजित पवार यांच्या अखेरच्या मानवंदनेसाठी ते उपस्थित होते.

Emotional moment as Ajit Pawar’s long-time bodyguards struggle to hold back tears during his funeral procession in Baramati, reflecting loyalty and loss.
Ajit Pawar Last Rites: चारच दिवसांमध्ये अजितदादांनी केलेलं विधान खरं ठरलं! त्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे त्यांच्या निष्ठेचे आणि प्रेमाचे प्रतीक ठरले. बारामतीत आज अजित पवार यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. हजारो कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहणार असून, राज्यातील राजकीय वर्तुळात शोक आणि शून्यता पसरली आहे. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com