Delhi Pollution  Sarkarnama
देश

सर्वोच्च न्यायालयाने सुचवला राजधानी लॉकडाऊन करण्याचा पर्याय

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) किमान दोन दिवस तरी दिल्लीत (Delhi Lockdown) लॉकडाऊन लावावा असा सल्ला दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या विषारी हवेपासून बालके, मुले व ज्येष्ठ नागरिकांचा जीव वाचवायचा असेल तर दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लावावा व शाळाही बंद ठेवाव्यात असा सल्ला पर्यावरण तज्ज्ञांसह विविध जाणकारांनी यापुर्वीच दिला आहे. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही किमान दोन दिवस तरी दिल्लीत लॉकडाऊन लावावा असा केंद्र सरकारसा सल्ला दिला आहे.

लॉकडाऊनचा सल्ला देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कानपिचक्याही दिल्या आहेत. न्यायालय म्हणाले, दिल्लीत परिस्थिती इतकी बिघडली आहे की, नागरिक घरात देखील मास्क लावत आहेत. यावर केंद्र सरकारने काही तरी तात्काळ उपाय करायला हवा. ज्यामुळे दोन ते तीन दिवसात परिस्थितीमध्ये थोडी तरी सुधारणा होवू शकेल. यथावकाश काय करायचे यावर बघता येईल. पण आता पावलं उचलणे गरजेचे आहे. केंद्राने राजकारण आणि सरकार यापलिकडे जावून काही तकी विचार करायला हवा, असेही न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला देखील फटकारले आहे. दिल्ली सरकार केवळ शेतकऱ्यांना या प्रदूषणासाठी जबाबदार धरत आहेत. पण हे प्रदूषण केवळ शेतकऱ्यांनीच केलेले नाही. वहाने आणि फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणाचे काय? ते रोखण्यासाठी काय केले? असे सवाल न्यायालयाने विचारले आहेत. न्यायालयात यावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असून केंद्र आणि राज्याला प्रदूषण थांबवण्यासाठी काय केले याची माहितीही मागवण्यात आली आहे.

दिल्लीत प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर प्रदूषणाची समस्या डोकं वर काढत असते. दिवाळीतील फटाके व शेतातील काडीकचरा जाळणे हे या प्रदूषणाचे मुख्य घटक असले तरीही ते एकमेव कारण नसल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. इतर कारणांमध्ये, दिल्लीतील बांधकामांमध्ये झालेली प्रचंड वाढ, त्यांच्यावरील बंदीची ऐशीतैशी, रस्त्यांवर धूर ओकत जाणाऱ्या लाखो गाड्यांमध्ये दिवसागणिक होणारी प्रचंड वाढ, वीजनिर्मिती प्रकल्प वऔद्योगिक प्रदूषण हेही घटक दिल्लीची हवा अतिविषारी बनविण्यात तेवढेच मोठे योगदान देतात, असेही अभ्यासकांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT