NCP Anniversary News  Sarkarnama
देश

Sharad Pawar News : शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली ; सुप्रिया सुळे, पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी..

NCP Anniversary News : सुळे आणि प्रफुल पटेल यांची नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

NCP Anniversary News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.या नव्या जबाबदारी सह सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे,

ही माझी पहिली जबाबदारी असेल -पटेल

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्यकारीत आहेत. नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर पटेल म्हणाले, "मी सुरुवातीपासून पक्षाने दिलेले काम करीत आलो आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही जबाबदारी मोठी नाही. हे पद जरी नवीन असले तरी माझ्यासाठी हे काम जुने आहे,"

"पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणे ही माझी पहिली जबाबदारी असेल. माझ्यासाठी कुठलीही जबाबदारी नवीन नाही. मी पवार साहेबांसोबत राष्ट्रीय पातळीपर्यंत काम केलं आहे. सुप्रियाताई सोबत ही नवी जबाबदारी मिळाली आहे. नवीन नेतृत्त्व तयार करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.आम्हाला यश मिळणार," असा विश्वास पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.

याला सरकार जबाबदार-पवार

"जनतेची सेवा करण्यासाठी २४ वर्ष संधी मिळाली. सहकाऱ्यांचे आभार. शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचा जन्म झाला. इतके वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली त्यासाठी सर्वांचे आभार," अशा भावना शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या. पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला

"भाजपने दिलेले आश्वासने पाळली नाहीत, त्यामुळे अनेक राज्यात त्यांची सत्ता गेली आहे. अनेक राज्यात जनतेनं भाजपला दूर ठेवलं. भाजपने सत्तेचा गैरवापर सुरु केला आहे. शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला नाही. आज शेतकऱ्यांची स्थिती खूप गंभीर आहे, याला सरकार जबाबदार आहे," असे पवार म्हणाले.

काही दिवसापूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीत त्याचे पडसाद उमटले होते, तेव्हा पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा होती. पवार यांच्या घोषणेनंतर आज सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT