NCP Anniversary News : आर. आर. आबांच्या आठवणीनं सुप्रिया सुळे भावुक ; राष्ट्रवादीच्या जडणघडणीत..

Supriya Sule emotional on R. R. Patil : सुप्रिया सुळे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.
Supriya Sule ,  R. R. Patil :
Supriya Sule , R. R. Patil :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai NCP foundation Day News : राष्ट्रवादी काँग्रेस आज (शनिवार) पंचविसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तर मुंबई राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षाचा वर्धापन साजरा होत आहे.

यानिमित्ताने सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या जडणघडणीचा आढावा घेतला. त्या माध्यमांशी बोलत होत्या. राष्ट्रवादी आज २५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे, राष्ट्रवादीच्या जडणघडणीत अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांचे योगदान आहे. २५ वर्षात आपले भाग्य आणि जनतेचे आशीवार्दामुळे १९ ते २० वर्ष सत्तेत राहिलो आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मान सन्मान वाढला,"

Supriya Sule ,  R. R. Patil :
NCP Anniversary News : 'पंचवीशी' राष्ट्रवादीची, आतुरता मुख्यमंत्री पदाची..! संधीचं सोनं करण्याचं..

राष्ट्रवादी पंचविशी गाठत असताना सुप्रिया सुळे यांनी अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. "पंचवीस वर्षात अनेक जण राष्ट्रवादीने गमावले. यात ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांच्या खांद्यावर पक्षाने जबाबदारी दिली होती, त्यामुळे पक्ष इथपर्यंत आला आहे. त्यांच्या योगदानास सलाम करुया,"

Supriya Sule ,  R. R. Patil :
Priyanka Gandhi Will Contest Lok Sabha Elections : प्रियंका गांधी लोकसभा लढणार ? ; काँग्रेसची नवी खेळी, सोनिया गांधींनी सांगितलं..

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जनतेची सेवा करण्यासाठी झाली आहे. जनतेच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी राष्ट्रवादीची स्थापना झाली आहे.कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने चांगली कामगिरी केली. राज्य घटनेत विरोधी पक्षाला जबाबदारी असते त्यामुळे सध्या सरकारचे काय चुकते हे दाखविण्याची जबाबदारी आपली आहे," असे सुळे म्हणाल्या.

मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विद्या चव्हाण पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, तर दिल्लीतील कार्यक्रमास प्रफुल पटेल, अजित पवार, छगन भूजबळ, वंदना चव्हाण, सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com