Ajit Pawar
Ajit Pawar  Sarkarnama
देश

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजितदादांचा 'जलवा'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा जलवा पाह्यला मिळाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे नाव घेताच पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत डाळ्यांचा कडकडाट केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. या अधिवेशनामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अधिक काळ सत्तेमध्ये राहिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी भाषणात राष्ट्रवादीच्या प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये सर्वांत चांगली अर्थव्यवस्था हाताळणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्याची अर्थव्यस्था चांगल्याप्रकारे हाताळल्यामुळे केंद्र सरकारने राज्याचे कौतुक केले, असल्याचे सुळे यांनी सांगितले.

राज्याचे अर्थकारण अजित पवार यांच्या हातात होते. त्यांनी खुप चांगले काम केले, असे सुळे यांनी सांगताच स्टेडियमवर एकच डाळ्यांचा कडकडाट झाला. पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. टाळ्या इतक्या वाजत होत्या की सुळे यांना थोडावेळ भाषण थांबवावे लागले. यावेळी बोलताना सुळे यांनी राजेश टोपे यांचेही कौतुक केले. टोपे यांनी कोरोना काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत चांगले काम केले, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) २०२०-२०२१ मध्ये राजकोषीय तूट तीन टक्यांच्या खाली म्हणजे 2. 69 टक्क्यांपर्यंत आणण्यात राज्याला यश आले आहे. या काळामध्ये अजित पवार राज्याचे अर्थमंत्री होते. कॅगचा अहवाल (CAG report) पावसाळी विधानसभेमध्ये मांडण्यात आला होता. या अहवालानुसार राज्यावरचे कर्ज 2016-17 मध्ये चार लाख कोटी एवढे होते. ते आता पाच लाख 48 हजार 176 कोटी झाल्याचे म्हटले आहे. तसेच अहवालामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT