तामीळनाडूच्या महिलांनी राहुल गांधींसमोर ठेवला लग्नाचा प्रस्ताव...

'भारत जोडो' यात्रा ही १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून जाणार आहे. सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर हे ३,७५० किलोमीटरच अंतर चालणार आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

चेन्नई : वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo) काढण्यात येत आहे. ही यात्रा १५० दिवसांत ३ हजार ७५० किलोमीटर अंतर कापणार आहे. या पदयात्रेत काँग्रेस नेते जनतेशी संवाद साधत आहेत. खासदार जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी या भेटीशी संबंधित एक रंजक गोष्ट ट्विटद्वारे सांगितली आहे. खासदार राहुल गांधी हे तामिळनाडूतील (Tamil Nadu) महिलांशी चर्चा करत होते. त्यावेळी एका महिलेने राहुल गांधींसमोर लग्नाचा प्रस्ताव (marriage proposal) ठेवला. ती महिला म्हणाले की, ‘राहुल गांधींचे तामिळनाडूवर प्रेम आहे, त्यामुळे त्यांचे लग्न एका तामिळ तरुणीसोबत करण्यास तयार आहे.’ (Tamil Nadu women proposed marriage to Rahul Gandhi)

Rahul Gandhi
महादेव जानकर करणार भाजपची गोची; बारामती स्वबळावर लढण्याची घोषणा!

काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा ही १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून जाणार आहे. सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीत कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर हे ३,७५० किलोमीटरच अंतर चालणार आहे. तसेच, २२ मोठ्या शहरांमध्ये मेगा रॅली काढण्यात येणार आहे. भारत जोडो यात्रेचा केरळमधील १९ दिवसांचा प्रवास रविवारी सकाळी राजधानी तिरुअनंतपुरमच्या परसाला परिसरातून सुरू झाला आहे. तीन तासांच्या प्रवासाचा पहिला टप्पा येथील नेयट्टींकारा येथे सकाळी साडेदहा वाजता संपला आणि तीन तासांच्या प्रवासाचा दुसरा टप्पा दुपारी चारनंतर सुरू होणार आहे.

माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट म्हटले आहे की, राहुल गांधी आज (ता. ११ सप्टेंबर) दुपारी मार्तंडममधील महिला मनरेगा कामगारांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका महिलेने सांगितले की, मला माहित आहे की राहुल गांधींचे तामिळनाडूवर प्रेम आहे आणि त्यांचे लग्न एका तामिळ मुलीशी करू इच्छिते.’

Rahul Gandhi
खासदार श्रीकांत शिंदेंचे भाजपला उत्तर; ‘माझे जे काही होईल, ते कल्याणमधूनच...’

दरम्यान, प्रियंका गांधी-वड्रा यांनीही यात्रेचे फोटो शेअर म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेबद्दल समाजातील प्रत्येक घटक उत्साही आहे. शेतकरी, मजूर, तरुण, महिला, मुले आणि वृद्ध यांच्या सहभागातून आणि उत्साहावरून ते दिसून दिसून येत आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, देशातील जनतेचा संदेश स्पष्ट आहे, महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकट आणि फुटीरतावादी राजकारण संपले पाहिजे. यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाने उत्साहित झालेल्या काँग्रेस पक्षाने ट्विटरवर लिहिले की, “हात भेटत आहेत, हृदये जोडत आहेत. भारत जोडो यात्रा भारताला एकत्र आणत आहे.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com