Inflation| Fuel price hike| supriya sule|
Inflation| Fuel price hike| supriya sule| 
देश

सुप्रिया सुळे म्हणतात, दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे महागाईही वाढणार नाही

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात महागाईने (Inflation) कळस गाठला आहे. पण जेव्हा देशात निवडणूका असतात तेव्हा केंद्रसरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. त्यामुळे आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्रसरकार निवडणूकांमध्ये व्यस्त राहिल आणि देशात गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, अशी खोचक टिपण्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी लोकसभेत बोलताना केली.

लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी, देशातील इंधन दरवाढीच्या (Fuel price hike) मुद्द्यावरुन केंद्रसरकारवर हल्लाबोल केला. महागाईसारखे अत्यंत गंभीर विषय आज देशासमोर आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या विषयावरून लोकांचे लक्ष भरकटवले जात असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

केंद्रसरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमत देऊन विजयी केले. पण निवडणूका संपताच केंद्रसरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. आधीच महागाई उच्चांक असताना केंद्राने पुन्हा ही दरवाढ जनतेवर लादली असल्याचा आरोप यावेळी केला.

पेट्रोल-डिझेच्या दरवाढीमुळे जनसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून त्यांचे आर्थिक गणितही कोलमडले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात होणाऱ्या दरवाढीचा परिणाम महागाईवरही होतो. या सर्व मुद्द्यांकडे लक्ष वेधत सुप्रिया सुळे यांनी आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्रसरकार निवडणुकांमध्ये व्यस्त राहिल आणि परिणामी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार नाही, असे स्पष्ट केले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या मागणीनंतर, देशातील विरोधी पक्षांनी इंधन आणि गॅसच्या दरवाढीच्या निषेध केला. राष्ट्रीय काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील सदस्यांनी घोषणाबाजी करत देशातील वाढलेले इंधन दर मागे घेण्याची मागणी करत सभागृहावर बहिष्कार टाकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT