Mukesh Dalal, Narendra Modi Sarkarnama
देश

Surat Lok Sabha Constituency Result : भाजपच्या पहिल्या खासदाराचा विजय; मतमोजणीआधीच निकाल

Lok Sabha Election 2024 Result Election Result Update Surat Constituency Nilesh Kumbhani Mukesh Dalal : काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा विजय निश्चित झाला.

Rajanand More

Surat Constituency Result : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असली तरी त्याआधीच भाजपच्या पहिल्या खासदाराचा विजय झाला आहे. हा पहिला निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधून लागला आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातच सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवार अर्ज बाद झाल्यानंतर इतर आठ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. तिथेच दलाल यांचा विजय निश्चित झाला.

भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील मततानाआधीच दलाल यांना विजयी घोषित करत प्रमाणपत्रही दिले. त्यानंतर काही तासांतच कुंभानी हे बेपत्ता झाले होते.

निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपचा पहिला विजय निश्चित झाला. मागील दोन टर्मच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय झाल्याने देशात त्याची बरीच चर्चाही झाली. मात्र, काँग्रेसने टीकास्त्र सोडत ही स्क्रीप्ट भाजपनेच लिहिली असल्याची टीका केली होती.

कसा झाला बिनविरोध विजय?

नीलेश कुंभानी यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरील सूचकांच्या सह्यांवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता. तसेच तीन सूचकांनीही या सह्या आपल्या नसल्याचा दावा निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कुंभानी यांना सूचकांसह बोलावले होते. पण सूचक हजर न झाल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. डमी उमेदवाराचाही अर्ज बाद ठरला, तर उरलेल्या आठ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने दलाल यांचा विजय सुकर झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT