Lok Sabha Election Result Live : भाजपला स्वबळावर बहुमत नाहीच; 'इंडिया'ची मुसंडी

India General Election Results Live 2024 Narendra Modi Vs Rahul Gandhi (INDIA Vs NDA) Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. एनडीए विरुध्द इंडिया आघाडी असा थेट सामना होत आहे.
Lok Sabha Election Result Live
Lok Sabha Election Result LiveSarkarnama

Lok Sabha Election 2024 Result : एनडीएची सत्ता 

देशात एनडीएची सलग तिसऱ्यांदा सत्ता येणार असली तरी भाजपला यावेळी स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. भाजपला जेमजेम 290 पर्यंत पोहचता आले. तर इंडिया आघाडीने मुसंडी मारत 230 पर्यंत आघाडी घेतली आहे.

Amit Shah : अमित शाहांचा विक्रमी विजय

अमित शाह यांनी गांधीनगर मतदारसंघातून विक्रमी विजय मिळवला आहे. त्यांना तब्बल 10 लाखांहून अधिक मते मिळाली. सात लाखांहून अधिक मताधिक्याने त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सोनल पटेल यांचा पराभव केला.

PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मोदी पिछाडीवर होते.

Ajay Mishra : अजय मिश्रा यांचा पराभव

उत्तर प्रदेशातील खिरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा पराभव झाला आहे. त्यांना समाजवादी पक्षाने पराभूत केले. लखीमपूर खीरीमध्ये मिश्रा यांच्या मुलाने वाहनाखाली शेतकऱ्यांना चिरडले होते. त्यानंतर देशभरात मोठी टीका झाली होती. पण त्यानंतरही भाजपने मिश्रा यांना उमेदवारी दिली होती.

Rahul Gandhi : राहुल गांधींचा दणदणीत विजय

राहुल गांधी यांचा रायबरेली मतदारसंघात दणदणीत विजय झाला आहे. तब्बल चार लाख मताधिक्य घेत त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. वायनाडमध्ये मोठ्या मताधिक्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.

Gujarat Lok Sabha Election : काँग्रेसचं खातं उघडलं

गुजरातमध्ये काँग्रेससाठी दिलासादायक बातमी आहे. मागील दहा वर्षांत पहिल्यांदाच गुजरातमध्ये काँग्रेसचं खातं उघडला आहे. मागील दोन्ही निवडणुकीत भाजपसमोर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. यावेळी बनसकांता मतदारसंघात गनीबेन ठाकोर यांनी विजय मिळवत भाजपला पराभूत केले आहे. इतर सर्व 25 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

Ayodhya Election 2024 : भाजपचा पराभव

लोकसभा निवडणुकीआधी भाजपने राम मंदिराचा मुद्दा गाजवला होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा परिमाण झाला नाही. फैजाबाद लोकसभा मतदारसंघ भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव झाला आहे. त्यांचा समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी पराभव केला. त्यामुळे राम मंदिर निर्माण होऊनही मतदारांनी भाजपला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

Smruti Irani loksabha Result

मोठी बातमी! स्मृती इराणी यांचा दारूण पराभव

NDA Vs India Alliance : इंडिया आघाडी, एनडीएची बैठक

लोकसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्यानंतर एनडीए व इंडिया आघाडीने बुधवारी दिल्लीत बैठका बोलावली आहे. या बैठकांमध्ये सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Omar Abdullah : उमर अब्दुल्लांचा पराभव

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा पराभव झाला आहे. त्यांना बारामुल्ला मतदारसंघात अपक्ष उमेदवार अब्दुल रशीद शेख यांनी पराभूत केले.

Kangna Ranaut : कंगना रनौतची  विजयी आघाडी

Kangna Ranaut
Kangna RanautSarkarnama

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अभिनेत्री कंगना रनौत यांनी विजयी आघाडील घेतली आहे.काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह सुमारे 70 हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.

Indore Lok Sabha Constituency : नोटाला 1.68 लाख मतं 

मध्य प्रदेशातील इंदौर लोकसभा मतदारसंघात 'नोटा'ने विक्रम केला आहे. आतापर्यंत या मतदारसंघात नोटाला तब्बल 1.68 लाख मतं मिळाली आहेत. तर आघाडीवर असलेले भाजपचे उमेदवार शंकर ललवाणी यांना 7 लाख 89 हजार मतदान झाले आहे. उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेसने नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले होते.

Maneka Gandhi : मेनका गांधी पिछाडीवर

भाजपच्या सुलतानपूर मतदारसंघातील उमेदवार मेनका गांधी 10 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे रामभौर निषाद यांनी आघाडी घेतली आहे.

NDA Vs India Alliance : एनडीएला धक्का

एनडीएल मोठा धक्का बसताना दिसत आहे. सध्याच्या कलांनुसार एनडीएला केवळ 275 जागांवर आघाडी असल्याचे दिसते. तर इंडिया आघाडीने जवळपास 250 चा आकडा गाठला आहे. पुढील काही फेऱ्यांमध्ये चित्र स्पष्ट होईल. मात्र, एनडीएला 300 चा आकडाही पार करता येणार नाही, असे दिसते.

Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णा पिछाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या ऐन प्रचारात बाहेर आलेल्या सेक्स स्कँडलने कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांना धक्का बसला आहे. ते 15 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. सध्या प्रज्वल हे जेलमध्ये आहेत.

Punjab Lok Sabha Election : केजरीवालांना धक्का

पंजाब आणि दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही. तर पंजाबमध्ये विरोधात लढलेल्या आप आणि काँग्रेसला अनुक्रमे सात आणि तीन जागांवर आघाडी मिळालेली आहे. हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

Narendra Modi : नरेंद्र मोदींची मोठी आघाडी

सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघात आघाडीवर आहेत. त्यांनी 42 हजारांची आघाडी घेतली आहे.

Stock Market : शेअर बाजार कोसळला 

लोकसभा निवडणुकीच्या कलांमध्ये एनडीएच्या जागा कमी होताच शेअर बाजारातही मोठी उलथापालथ झाली आहे. शेअर बाजारा तीन हजार अंकांनी कोसळला आहे.

Smriti Irani : स्मृती इराणी पिछाडीवर

अमेठी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार व भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी पिछाडीवर पडल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी 25 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठी आघाडी

राहुल गांधी यांना वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली आहे. वायनाडमध्ये त्यांना 1 लाख 20 हजारांची आघाडी आहे.

Odisha Assembly Election Result : भाजपचे उमेदवार आघाडीवर

ओडिशामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरू असली तरी भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे सुरूवातीच्या कलांमध्ये दिसते.

Andhra Pradesh Assembly Result : जगनमोहन यांना धक्का

आंध्र प्रदेशात यावेळी सत्तांतर होणार असल्याचे चित्र आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत.

Varanasi Lok Sabha Election Result Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी 5000 मतांनी पिछाडीवर 

Lok Sabha Election Results 2024 : बहुमताचा आकडा गाठला

सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा 272 हा जादुई आकडा पार केला आहे. हाती आलेल्या 418 जागांच्या कलांमध्ये एनडीएला 287 तर इंडियाला केवळ 117 जागा मिळाल्या आहेत.

Karnataka Lok Sabha Election Result Live : कर्नाटकात भाजपची मुसंडी

कर्नाकटकमध्ये काँग्रेसची सत्ता असली तरी भाजपने सुरूवातीच्या कलांमध्ये मुसंडी मारल्याचे दिसते. एनडीएला 18 तर काँग्रेसला केवल सात जागांवर आघाडी मिळाली आहे.

Madhya Pradesh Lok Sabha Election Result Live : मध्य प्रदेशात भाजपची आघाडी

मध्य प्रदेशमध्ये 29 पैकी 22 जागांवर भाजपने आघाडीचे घेतल्याचे सुरूवातीच्या कलांवरून दिसते. तर केवळ एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे.

Lok Sabha Election Result Live : भाजप 200 पार

भाजपने पहिल्या अर्धा तासांतच 200 चार आकडा पार केला आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये एकट्या भाजपने हा आकडा गाठला आहे. तर इंडिया आघाडीचे 72 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

Gujarat Lok Sabha 2024 Result : गुजरात भाजपचेच 

गुजरातमधील 26 जागांपैकी 15 जागांचे कल हाती आले असून 14 जागांवर भाजपचे उमेदवार तर केवळ एक जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.

Uttar Pradesh Lok Sabha 2024 Result : काँग्रेसला 8 जागांवर आघाडी

देशात सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात 80 जागांपैकी सध्या 8 जागांवर काँग्रेस तर 5 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Delhi Lok Sabha 2024 Result : दिल्लीत भाजपच

दिल्लीमध्ये सात जागा असून सर्व जागांवर भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. आप आणि काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर पडले आहेत.

General Election Result Live : भाजपची शंभरी पार

पहिल्या 20 मिनिटांमध्ये हाती आलेल्या कलानुसार भाजपने शंभराचा आकडा ओलांडला आहे. देशात भाजप 121 जागांवर आघाडीवर असून इंडिया आघाडीला तिशीच्या आतच आहे. इंडिया आघाडीचे 27 उमेदवार आघाडीवर आहेत.

NDA Vs India Alliance : भाजपला आघाडी

मतमोजणीचे कल हाती येऊ लागले असून देशात भाजपने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 31 तर काँग्रेस सात जागांवर आघाडीवर आहे.

Lok Sabha Election 2024 Results : मतमोजणीला सुरुवात देशाचा पहिला कल काही क्षणात हाती येणार, देशभरातील निकाल सर्वात आधी 'सरकारनामा'वर...

Lok Sabha Election 2024 Results : एक्झिट पोलचे खरे ठरणार?

एक्झिट पोलने एनडीएला 360 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला 150 ते 175 जागा मिळू शकतात. हे पोल खरे ठरल्यास नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मागील काही वर्षांत अनेक पोलचे अंदाज खरे ठरले आहेत.

सत्ता कुणाची?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार, याचा फैसला आज होणार आहे. एक्झिट पोलने भाजपचा बाजूने कौल दिला असला तरी इंडिया आघाडीही 295 जागांवर ठाम आहे. त्यामुळे विरोधकांचा दावा खरा ठरणार की पुन्हा नरेंद्र मोदींची त्सुनामी येणार, हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.