Swami Avimukteshwaranand Sarkarnama
देश

Swami Avimukteshwaranand : बांगलादेशातील अस्थिरता; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्र्वरानंद 'यामुळं' टेन्शनमध्ये...

Swami Avimukteswarananda concern about Hindus stuck in Bangladesh : बांगलादेशातील अस्थितरमुळे तिथे हजारो हिंदू अडकले आहेत. या अडकलेल्या हिंदूंवर ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : बांगलादेशात सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आरक्षणासह इतर मुद्यांवरून आंदोलनाला तीव्र हिंसक वळण लागलं आहे. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्याने पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जाव लागलं.

बांगलादेशातील तिथल्या राजकीय अस्थिरतेमुळे हिंदुस्थानची चिंता वाढली असून, त्यावर आता तिथं हिंदू आणि हिंदूंच्या संपत्तींना टार्गेट केले जाऊ लागले आहे. बांगलादेशातील अस्थिरतेवर केंद्र सरकारमध्ये वेगवान हालचाली सुरू आहेत. यातच ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद बांगलादेशातील अस्थिरतेवर चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशामधील हिंदूंच्या सुरक्षितेविषयी काळजी व्यक्त केली आहे.

बांगलादेशातील पंतप्रधान शेख हसीना तिथल्या अस्थिरतेच्या परिस्थितीनंतर भारतात पळून आल्या आहेत. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंबाबत (Hindu) चिंता व्यक्त केली जात आहे. ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी यावर प्रतिक्रिया दिली. बांगलादेशामधील सैन्याला हिंदूंचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

"बांगलादेशाचे सैनिक लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळतील. आमचे 10 टक्के हिंदू बांधव बांगलादेशात राहतात. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आमच्या हिंदू जनतेचे रक्षण करा. तशी बांगलादेशातील सैनिकांना विनंती आहे. बांगलादेशात राहणारे हे हिंदू तुमच्या देशाचे नागरिक आहेत. प्रत्येक नागरिकांना एकाच प्रकारची वागणूक, व्यवस्था आणि व्यवहार आवश्यक आहे. तिथे अडकलेल्या हिंदूंनी देखील परिस्थितीनुसार धैर्य राखत आपले संरक्षण करावे", असे आवाहन ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे काही पटले नाही. महाविकास आघाडीची साथ देणारे उद्धव ठाकरे यांच्या हिंदूत्वाला आशीर्वाद दिले. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर तुटून पडले होते. त्यावेळी भाजप म्हणजे हिंदू नाही, आरएसएस म्हणजे हिंदू नाही आणि मोदी म्हणजे हिंदू नाही, असे रोखठोक भाषणाने भाजपवर तिखट प्रहार केले होते. राहुल गांधी यांच्या या भाषणावर हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप भाजपने करत राळ उठवली होती.

ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी त्यावेळी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत होती. राहुल गांधी यांचे भाषण एेकले असून, त्यात कोठेही हिंदूचा अपमान झाला नसल्याचे म्हणत क्लिन चिट दिली. तेव्हापासून ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे अधिकच प्रकाशझोतात आले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचं बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष

बांगलादेशातील परिस्थिती प्रत्येक क्षणाला अधिक हिंसक होत आहेत. आंदोलकांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानावर कब्जा करत लुटालूट आणि जाळपोळ केली. तसेच काही धार्मिक स्थळांना देखील टार्गेट केले. तिथे लुटमार आणि जाळपोळ केली. या अस्थिरतेमुळे बांगलादेशातील हिंदूंमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. या अस्थिरतेच्या परिस्थितीवर देशाच्या केंद्र सरकारमध्ये वेगवान हालचाली सुरू आहेत. सर्व पक्षीय बैठक झाली. राहुल गांधी यांनी बांगलादेशामधील अस्थिरतेमागे परकीय शक्तींचा हात, तर नाही ना, याची दखल घेण्याची सूचना नाही. तसेच परराष्ट्रमंत्री प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून घेत तिथं अडकलेल्या भारतीयांविषयी माहिती घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT