Rahul Gandhi : मोदी सरकारकडून विमा हप्त्यातून 24 हजार कोटी वसूल; ‘GST’ मुक्तीसाठी एल्गार...

India Alliance Modi Government Parliament : आरोग्य विम्यावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी इंडिया आघाडीकडून करण्यात आली आहे.
Protest in Parliament
Protest in ParliamentSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : आरोग्य विम्यावरील वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) मुद्दा चांगलाच तापला आहे. मोदी सरकारने जीएसटीच्या माध्यमातून आरोग्य विम्यावरील हप्त्यातून सर्वसामान्य नागरिकांकडून 24 हजार कोटी वसूल केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला आहे.

आरोग्य विम्यावरील जीएसटी रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी इंडिया आघाडीने संसदेत मोठे आंदोलन केले. राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होती. त्याआधी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यानही अनेक सदस्यांनी आरोग्य विम्यावरील जीएसटीचा मुद्दा उचलून धरला होता. जीएसटी रद्द करण्याची मागणी अनेक सदस्यांनी केली होती.

Protest in Parliament
Lok Sabha Session : ‘बंगालचे मॉडेल…’ हे शब्द ऐकताच अमित शाह खदखदून हसले! उत्तराने लोकसभेत हशा...    

विरोधकांनी या मुद्दयावर मंगळवारी पहिल्यांदाच संसदेत एल्गार पुकारला. राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट कर मोदी सरकारला धारेवर धरले. आयुष्यात येणार्या आरोग्य संकटात कुणासमोर झुकावे लागू नये म्हणून पै-पै जोडून कोट्यवधी सर्वसामान्य हिंदूस्तानी आरोग्य विम्याचा हप्ता भरतात. त्यांच्याकडूनही मोदी सरकारने 24 हजार कोटी वसूल केले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

प्रत्येक आपत्तीत टॅक्सची संधी शोधण्याचा भाजप सरकारचा असंवेदनशील विचारांचे हे एक उदाहरण आहे. या संधीसाधू विचारांचा इंडिया आघाडी विरोध करत आहे. आरोग्य आणि जीवन विम्याला जीएसटी मुक्त करावेच लागेल, असे म्हणत राहुल यांनी पुढील काळात यावर आवाज उठवणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

Protest in Parliament
Bangladesh Crisis : बांगलादेशवर करडी नजर, पण भारतीयांना लगेच परत आणणार नाही! सरकारकडून स्पष्टीकरण

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनीही या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते व खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी चार दिवसांपूर्वी आरोग्य व जीवन विम्यावरील जीएसटी लोकविरोधी असल्याचे म्हटले होते. जीएसटी मुक्त विमा करण्यासाठी मोठे आंदोलन उभे करण्याची वेळ आल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असेही ते म्हणाले होते. त्यामुळे पुढील काही दिवसांत इंडिया आघाडीकडून देशभरात आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com