shankaracharya sarkarnama
देश

Ram Mandir Consecration : ...तर मूर्तीत भूत-प्रेतांचा वास, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून शंकराचार्यांनी सुनावले

Anand Surwase

Ram Mandir : अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. लाखो रामभक्त आणि व्हीआयपींच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. मात्र, यावरून धार्मिक रुढी-परंपरांचा वाद निर्माण झाला आहे. हिंदू धर्मगुरू म्हणून पूजनीय असलेल्या चारही शंकराचार्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावण्यास नकार दिला आहे.

मंदिराचे बांधकाम अपूर्ण आहे. तसेच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी हिंदू धर्मात काही विधी आणि नियम निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, त्याचे पालन केले जात नसल्याचा आरोप शंकराचार्यांकडून करण्यात येत आहे. याविषयी आधीच स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी मत व्यक्त केले होते. आता स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजिणाऱ्यांना टार्गेट केले आहे.

पुरीस्थित गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या सोहळ्यात सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच कोणीच आमचे नुकसान करू शकत नाही. आमच्याविरोधात जाण्याची चूक करू नये, असा इशाराच स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी श्रीराम मंदिर सोहळ्याच्या आयोजकांना दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही काही निवडणुका लढवून या शंकराचार्यांच्या गादीवर आलेलो नाहीत. ज्यांची गादी आहे त्यांच्याकडून हा वारसा आमच्याकडे आला आहे. त्यामुळे आमचे कोणीच काही वाकडं करू शकत नाही, अशा कठोर शब्दांत स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून मोदी सरकारची आणि आयोजकांची कानउघाडणी केली.

शंकराचार्यांचे पद शासनकर्त्यांवरील शासन

जर कोणी शंकराचार्यांच्या गादीला विरोध करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो कितीही ताकदवर असला तरी तो सुरक्षित राहणार नाही. तसेच त्यांनी असे समजू नये, की आम्ही जनतेला भडकावत आहोत. मात्र आमच्या बोलण्याचा जनता अर्थ समजून घेते आणि त्याचे पालन करते. कोणी आम्हाला दुर्बल समजू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शंकराचार्यांचे पद शासनकर्त्यांवरील शासन आहे, असे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले.

...तर मूर्तीत भूत-प्रेतांचा वास

प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. तो विधी धर्मशास्त्रानुसार होत नाही. त्यामुळेच या सोहळ्यासाठी आमचे जाणे उचित नाही. मूर्तीमध्ये देवतांचा सहवास आणि तेज त्यावेळी प्रतिबिंबीत होते. जर त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधिवत केली जाते, जर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही विधिवत नाही झाली तर देवी-देवतांचे तेज बाधित होते. भूत-प्रेतांच्या या शक्तीचा अधिवास मूर्तीमध्ये होतो आणि त्या संपूर्ण परिसराला उद्ध्वस्त करतात. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा, मूर्ती प्रतिष्ठापनासारख्या धर्मविधींचा खेळ केला नाही पाहिजे, असेही शंकराचार्य म्हणाले.

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT