Arvind Kejriwal with Family Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : आई-वडील आणि पत्नीसोबत मी वाट पाहतोय! केजरीवालांच्या फोटोवर पोलिसांचा पलटवार

Swati Maliwal Assault Case : स्वाती मालीवाल यांना केजरीवालांच्या घरात विभव कुमार यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना अटकही झाली आहे.

Rajanand More

Delhi Police News : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांनी बुधवारी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर गुरूवारी याप्रकरणी त्यांच्या आई-वडिलांचीही दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे समोर आले. याबाबत केजरीवालांनीच एक्सवर पोस्ट करून माहिती दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनीही (Delhi Police) त्यावर प्रत्युत्तर देताना त्यांनीच वेळ दिला नसल्याचे म्हटले आहे.

स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी (Swati Maliwal Assault Case) केजरीवालांचे खासगी सचिव विभव कुमार (Bibhav Kumar) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांकडून केली जात आहे. आतापर्यंत केजरीवालांच्या घरातील कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात आले असून घरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहे. (Latest Political News)

पोलिसांनी केजरीवालांसह त्यांचे आई-वडील व पत्नी सुनिता (Sunita Kejriwal) यांचीही चौकशी केली जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. घटनेच्यावेळी हे सर्वजण घरीच असल्याने त्यांची चौकशी होऊ शकते असे म्हटले जात होते. केजरीवालांनी गुरूवारी सकाळी याबाबत एक्सवर पोस्ट करून दुजोराही दिला. (Delhi CM Arvind Kejriwal Latest News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केजरीवालांनी आई-वडील व पत्नीसोबत घरात बसल्याचा फोटो आणि एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, मी माझे आई-वडील आणि पत्नीसोबत पोलिसांची वाट पाहत आहे. काल पोलिसांनी फोन करून आई-वडिलांच्या चौकशीसाठी वेळ मागितली होती. पण ते येणार की नाही, याबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही.

केजरीवालांच्या या पोस्टनंतर दिल्ली पोलिसांचेही स्पष्टीकरण आले आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) रविंद्र सिंह यादव यांनी म्हटले की, मुख्यमंत्री केजरीवाल, त्यांची पत्नी आणि आई-वडिलाची चौकशी केली जाणार होती. पण त्यांच्याकडून अजूनपर्यंत वेळ देण्यात आलेला नाही. पण घराबाहेर मीडियाला बोलवून आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे चौकशीचा निर्णय टाळण्यात आला. आता गरज भासल्यास त्याबाबत विचार केला जाईल, असेही यादव यांनी स्पष्ट केले.

केजरीवालांचे पहिल्यांदाच भाष्य

मालीवाल मारहाणप्रकरणी केजरीवालांनी नऊ दिवस एक शब्दही उच्चारला नव्हता. त्यामुळे भाजपकडून टीका केली जात होती. त्यामुळे केजरीवालांवरील दबाव वाढला होता. अखेर बुधवारी त्यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, या प्रकरणाला दोन बाजू आहेत. पोलिसांनी याचा नि:पक्षपातीपणे त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT