Varun Gandhi News : वरुण गांधींकडून आईच्या प्रचारात अमेठी, रायबरेलीचा उल्लेख; म्हणाले, देशात एकमेव मतदारसंघ, जिथे...

Maneka Gandhi Constituency : मेनका गांधी यांच्या प्रचारासाठी अखेर वरुण गांधी मैदानात उतरले आहेत. तिकीट कापल्यापासून ते भाजपच्या कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी पुढे आले नव्हते.
Maneka Gandhi, Varun Gandhi
Maneka Gandhi, Varun GandhiSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Political News : पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपासून दूर असलेले वरुण गांधी (Varun Gandhi News) अखेर सक्रीय झाले आहेत. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मतदारसंघात त्यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. या मतदारसंघात त्यांच्या आई मेनका गांधी (Maneka Gandhi) सलग दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. वरुण गांधीही या मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. मात्र, अनेक दिवसांपासून ते प्रचारापासून दूर असल्याने तर्कवितर्क लढवले जात होते.

वरुण गांधी यांनी आई मेनका गांधी यांचा प्रचार सुरू केला आहे. पहिल्याच सभेत त्यांना अमेठी (Amethi) आणि रायबरेली (Raebareli) मतदारसंघांचीही आठवण झाली. ते म्हणाले, आम्ही काही वर्षांपुर्वी निवडणूक लढण्यासाठी सुलतानपूरमध्ये (Sultanpur) आलो त्यावेळी लोक म्हणाले होते, अमेठी आणि रायबरेलीमध्ये जे वैभव आहे, तसेच वैभव सुलतानपूरमध्येही यावे. आज देशात सुलतानपूरही मुख्य प्रवाहात पहिल्या रांगेत असल्याने आनंद होत आहे. (Lok Sabha election 2024)

Maneka Gandhi, Varun Gandhi
Jayant Sinha News : जयंत सिन्हांनी भाजपलाच पाडलं तोंडावर; खरमरीत पत्रातून दिलं सडेतोड उत्तर

सभेला संबोधित करताना वरुण गांधी म्हणाले, संपूर्ण देशात 543 मतदारसंघात निवडणूक (Election 2024 News) होत आहे. अनेक ठिकाणी मोठे, अनुभवी, करिष्मा दाखवणारे लोक निवडणूक लढवत आहेत. पण संपूर्ण देशात सुलतानपूर हा एकच मतदारसंघ असा आहे, जिथे खासदाराला कुणी खासदारजी म्हणत नाहीत, मंत्री म्हणून किंवा नावानेही बोलवत नाही. सुलतानपूरमधील लोक खासदारांना माताजी म्हणतात. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, वरुण गांधी प्रचारात सक्रीय झाल्यानंतर मेनका गांधींची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मी म्हटल्यानंतर ते प्रचाराला आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि वरुण गांधी यांच्या तुलनेवर बोलताना त्या म्हणाल्या, प्रत्येकाचे स्वतंत्र मार्ग असतात, नशीब असते. कुवतीनुसार प्रत्येक जण आपला मार्ग निवडतील, असेही मेनका गांधी म्हणाल्या.

पीलीभीतमध्ये पहिल्यांदाच नाहीत गांधी

पीलीभीत लोकसभा मतदारसंघात 1996 पासून मेनका गांधी आणि वरुण गांधी यांचा वरचष्मा राहिला आहे. या मतदारसंघातून मेनका गांधी यांनी सातवेळा निवडणूक लढली आणि सहावेळा जिंकली आहे. तर वरुण गांधी दोनदा खासदार होते. मात्र, 2024 मध्ये 1996 नंतर पहिल्यांदाच दोघेही निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. त्यामुळे वरुण गांधी नाराज असल्याची चर्चा आहे.

Maneka Gandhi, Varun Gandhi
Lok Sabha Election 2024 : अखेरच्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात तब्बल 904 उमेदवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com