AAP MP Swati Maliwal Sarkarnama
देश

Swati Maliwal Assault Case : प्रेमाने मागायचा, जीवही दिला असता! मालीवाल खासदारकीवर थेटच बोलल्या...

Rajanand More

New Delhi Politics : दिल्लीतील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal Assault Case) मारहाण प्रकरण चांगलेच गाजत आहे. भाजपच्या हाती आयते कोलित मिळाले असून आप बॅकफुटवर गेले आहे. या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) बुधवारी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर गुरूवारी मालीवाल यांनी पहिल्यांदाच मीडियासमोर आपली भूमिका स्पष्टच करताना खासदारकीवरही भाष्य केले आहे.

मारहाण प्रकरणानंतर मालीवाल यांनी केजरीवालांसह पक्षाविरोधातही उघडपणे भूमिका घेतली आहे. त्यामुळे काही महिन्यांपुर्वीच पक्षाकडून मिळालेल्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) खासदारकीचा त्या राजीनामा देणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यावर मालीवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे. (Swati Maliwal Latest Update)

मालीवाल म्हणाल्या, माझी राज्यसभेची जागा त्यांना हवी होती, तर प्रेमाने मागायची. मी जीवही दिला असता. खासदारकी तर खूप छोटी गोष्ट आहे. आता जगातील कुठलीही ताकद लावली तरी मी राजीनामा देणार नाही. माझे संपूर्ण करिअर पाहिले तर कधीही पदाची अपेक्षा ठेवली नाही. 2006 मध्ये नोकरी सोडून त्यावेळी मी त्यांच्याशी जोडली गेली आहे. जमिनीवर काम करत आले आहे. 2006 ते 2012 पर्यंत सर्व कामांमध्ये मी महत्वाचा भाग होते. (Delhi Rajya Sabha MP Swati Maliwal News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजीनामा नाही

मला खासदारकीची कोणतीही अपेक्षा नाही. कोणत्याह पदाशी मी बांधलेली नाही. मी पद नसतानाही काम करू शकते. पण ज्यापध्दतीने त्यांनी मला मारहाण केली, आता जगातील कुठलीही ताकद आली तरी मी राजीनामा देणार नाही. यासाठी माझी बदनामी केली जात आहे. मी संसदेतील सर्वात तरूण सदस्य आहे. मी खूप प्रामाणिकपणे काम करून एक चांगले खासदार कसे असतात, हे दाखवून देईन, असे मालीवाल यांनी ठामपणे सांगितले.

विभव कुमार पॉवरफुल

विभव कुमार यांना 2006 पासून ओळखते. अरविंद केजरीवाल यांचे सर्वात जवळचे विभव कुमार आहेत. त्यांना आलिशान घर देण्यात आले आहे. कुठल्याही मंत्र्यालाही असे घर मिळालेले नाही. पक्षात ते एक पॉवरफुल आहेत. पक्षातील सर्व नेते त्यांना घाबरतात, अशी मालीवाल म्हणाल्या.

नार्को टेस्ट करायला तयार  

केजरीवालांच्या घरात चीरहरण झाले असून रोज चारित्र्यहनन होत आहे. त्यासाठी रोज पत्रकार परिषद घेतली जात आहे. मला ट्रोल केले जात आहे. हे प्रकरण इथेच थांबवावे, यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यासाठी हे केले जात आहे. एफआयआरमधील प्रत्येक शब्द खरा आहे. मी पॉलीग्राफ, नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. ही लढाई माझी एकटीचीच आहे, याची जाणीव मला आहे, असेही मालीवाल यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT