Tahawwur Rana Likely To Be Lodged In Tihar Jail Sarkarnama
देश

Tahawwur Rana: मुंबई हल्ल्यात 160 जणांचा जीव घेणाऱ्या तहव्वूर राणाला कुठल्या जेलमध्ये ठेवणार? बराकीत कोण असणार साथीदार...

Tahawwur Rana Likely To Be Lodged In Tihar Jail: एनआयएची कोठडी संपल्यानंतर त्याला कुठल्या जेलमध्ये ठेवणार, याबाबत गुरुवारी दिवसभर चर्चा सुरु होती. आयजीआय विमानतळापासून १० किमी अंतरावर असलेल्या तिहार या देशातील सर्वात मोठ्या तुरुंगात राणाला ठेवण्यात येणार आहे.

Mangesh Mahale

Tahawwur Rana Extradited 26/11 Attacks News Update: मुंबई 26/11 हल्ल्यात 160 व्यक्तींच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तहव्वूर राणा हा 18 दिवस एनआयएच्या (NIA) ताब्यात आहे. त्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येईल. राणाची न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्याला कुठल्या जेलमध्ये ठेवायचे याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याला जेल प्रशासन कुठल्या कोठडीत ठेवणार यांची माहिती समोर आली आहे.

एनआयएची कोठडी संपल्यानंतर त्याला कुठल्या जेलमध्ये ठेवणार, याबाबत गुरुवारी दिवसभर चर्चा सुरु होती. आयजीआय विमानतळापासून १० किमी अंतरावर असलेल्या तिहार या देशातील सर्वात मोठ्या तुरुंगात राणाला ठेवण्यात येणार आहे. तिहारमध्ये त्याला बराक क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

तिहारमधील त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था काय आहे?

देशातील सर्वाधिक सुरक्षित असलेले कारागृह म्हणून तिहार कारागृहाची ओळख आहे. येथे तामिळनाडू सशस्त्र सेना, सीआरपीएफ आणि तिहार कारागृह प्रशासन अशा तीन प्रकारच्या सुरक्षा यंत्रणेची कैद्यांवर नजर असते. कुख्यात गुन्हेगार छोटा राजन, नीरज बवानिया यासारख्या सराईत गुन्हेगार सध्या तिहारमध्ये आहेत. दोघांना उच्च स्तरीय बराकीत ठेवण्यात आले आहे.

बराक क्रमांक दोनमध्ये साधारपणे एक किंवा तीन कैद्यांना ठेवलं जातं. दोन कैद्यांना कधीही एकत्र ठेवलं जात नाही. साधारणपणे एक कैदी स्वतंत्रपणे एका बराकीत राहणे पसंत करीत नाही. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्याला काही दिवस एकटे ठेवलं जाते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वुर राणा याला काही दिवसासाठी एकटेच बराकीत ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. नंतर सुरक्षा यंत्रणेच्या आढावा घेतल्यानंतर त्याच्यासोबत कोणत्या गुन्हेगाराला ठेवणार, याचा निर्णय तिहार जेल प्रशासन घेणार आहे. ही प्रक्रिया खूप गुंतागुंतींची असते.

राणा यांच्यासोबत ठेवण्यात येणाऱ्या कैदीचा स्वभाव, वय, आरोग्य यांचा विचार करुन त्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास करुन याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येतो. तहव्वुर याच्या प्रकरणात अशाच प्रकारे प्रक्रिया राबवली जाणार आहे. पण त्याने जर स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली तिहार जेल प्रशासनाला त्याबाबत विचार करावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT