Tahawwur Rana Extradition : तहव्वूर राणाचा 'तो' प्लॅन ठरला मुंबईसाठी घातक, डेविड हेडलीला भारतात कसं पाठवलं? जाणून घ्या

Tahawwur Rana Extradited to India : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याचं गुरुवारी अमेरिकेकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं. राणाला विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आलं. त्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे त्याला 18 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
David Headley, Tahawwur Rana
David Headley, Tahawwur RanaSarkarnama
Published on
Updated on

Tahawwur Rana Extradition : मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याचं गुरुवारी अमेरिकेकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं. राणाला विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आलं. त्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे त्याला 18 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

अशातच आता तहव्वूर राणा याने मुंबईतील (Mumbai) हल्ल्याचा सह-सुत्रधार डेविड हेडलीला भारतीय व्हिसा मिळवून देण्यास मदत केली आणि त्याननंतर हल्ल्यापूर्वी हेडलीने मुंबईत येऊन रेकी केली होती, अशी माहिती मुंबई पोलिसांतील एका बड्या अधिकाऱ्याने दिली आहे.

तहव्वूर राणाने पाकिस्तानी सैन्याच्या मेडिकल कॉर्प्समध्ये सेवा बजावली आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तो 90 च्या दशकात कॅनडाला गेला. कॅनडाला जाण्यापूर्वी त्याने अमेरिकेतील शिकागो येथे इमिग्रेशन कन्सल्टन्सी फर्म सुरू केली होती.

David Headley, Tahawwur Rana
Tahawwur Rana: तहव्वुर राणाला फाशी होऊ शकते का? कायदा काय सांगतो

याचवेळी तहव्वूर राणाने इमिग्रेशन फर्मीच्या माध्यमातून डेविड हेडली याच्या भारतीय व्हिसाची मुदत दहा वर्षांनी वाढवण्यासाठी मदत केली होती, असंही पोलिसांनी गुरुवारी सांगितलं. शिवाय हेडलीने भारतातील आल्यावर इमिग्रेशनशी संबंधित काम करण्याचं नाटक केलं. या काळात तो सतत राणाच्या संपर्कात होता.

पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, डेविड हेडलीने भारतात असताना राणासोबत 230 हून अधिक फोन केले होते. धक्कादायक बाब म्हणजे, तहव्वूर राणा देखील 2008 च्या दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी भारतात आला होता. यावेळी तो पवई येथील एका हॉटेलमध्ये राहिला होता.

David Headley, Tahawwur Rana
Kiran Bedi Reaction : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर किरण बेदींची विशेष प्रतिक्रिया, म्हणाल्या ''मी सूचवेन, की शक्य असल्यास...''

याचवेळी त्याने एका व्यक्तीकडून मुंबईतील गर्दीच्या भागांची माहिती घेतली होती. याच माहितीच्या आधारे दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक प्रतिष्ठित आणि गर्दी असलेल्या स्थळांना लक्ष्य केलं. यामध्ये ताज आणि ओबेरॉय हॉटेल, लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश होता.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com