Tahawwur Rana NIA custody News update: देशाला हादरुन टाकणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याला गुरुवारी अखेर भारतात आणण्यात आले. त्याला रात्री दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर करण्यात आले, कोर्टानं त्याला 18 दिवसाच्या एनआयए कोठडी दिली आहे. राणा सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. आजपासून एनआयएचे अधिकारी त्याची चौकशी करतील.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून राणावर खटला चालवण्यात येणार आहे. २६/११ च्या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. यात सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले होते. अमेरिका आणि भारतातील कायद्याचा विचार केला तर या प्रकरणात तहव्वूर राणा याला फाशीची शिक्षा होऊ शकते. त्याला फाशी होणार ही नाही, अमेरिकेने प्रत्यार्पण केल्यानंतर त्या देशाचा कायदा काय सांगतो, त्यांच्या कायद्यात अशा गु्ह्यासाठी शिक्षेची काय तरतूद आहे, याबाबत जाणून घेऊयात
तहव्वुर राणाला काय शिक्षा होणार याबाबत सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील ज्ञानंत सिंह म्हणतात, "प्रत्यार्पण प्रकरणात आरोपी ज्या देशातून येत असेल तर त्याला भारतातही फाशीची शिक्षा होऊ शकते. राणा कॅनडाचा नागरिक आहे. याबाबत ते म्हणाले, आरोपी कोणत्या देशाचा नागरिक आहे हे महत्त्वाचे नाही, जर गुन्हा भारतात झाला असेल तर त्याच्यावर भारतातील कायद्यानुसार शिक्षा होईल. राणाला भारताचा कायदा लागू होईल.
अशा प्रत्यार्पण खटल्यात आरोपीला ज्या देशातून आणले जाते, तो देश काही अटी लावू शकतो. पण देशात आरोपीवर दाखल झालेले गुन्ह्याबात फाशीची शिक्षा असेल तर ते त्याला फासी देऊ शकत नाहीत. पण प्रत्यार्पण प्रक्रियेत दोन्ही देशातील कायदा काय सांगतो, यावर कोर्ट निकाल देते. अशा खटल्यात आरोपीला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाते. मुंबई हल्ला प्रकरणातील आरोपी अजमल कसाब याला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फासी देण्यात आली आहे. पण तहव्वुर राणाचं प्रकरण कसाबपेक्षा थोडं वेगळं आहे. राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणले जात आहे. अशा परिस्थितीत प्रत्यार्पणाच्या अटींनुसार त्याच्यावर खटला चालवून शिक्षा केली जाईल, असे कायदा सांगतो.
प्रत्यार्पण करारात राणावर जे आरोप भारताने केले आहेत. त्याबाबत खटला दाखल होईल. भारत आणि अमेरिका यांच्यात 1997 मध्ये प्रत्यार्पण कायदा झाला. यात कलम 8 नुसार ज्या गुन्ह्यासाठी प्रत्यार्पणाची मागणी केली जात असेल तर प्रत्यार्पणाची विनंती करणाऱ्या देशात प्रत्यार्पणाची विनंती करणाऱ्या देशात फाशीची शिक्षा होऊ शकते, परंतु प्रत्यार्पण देशाने त्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद केली नाही तर तो देश प्रत्यार्पणाची विनंती नाकारू शकतो. तहव्वुर राणावर दहशतवादाचा आरोप असल्याने त्याच्या बाबतीत हे कलम लागू होणार नाही. त्याच्यावर भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला असून दहशतवादाच्या गुन्ह्यात त्याला अमेरिकेत फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.याकूब मेमन
भारतीय न्यायव्यवस्थेनुसार फाशीची शिक्षा ही दुर्मिळ खटल्यामध्ये होते. पण अद्याप पर्यंतच्या प्रकरणावरुन भारताची न्यायव्यवस्थाही दहशतवाद्यांना फाशी देण्यास मागेपुढे पाहत नाही, हे अजमल कसाब यांच्या फाशीच्या शिक्षेवरुन स्पष्ट होते.संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन यांना फाशी देण्यात आली. तसे राणाला कोणती शिक्षा होणार हा न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आहे. भारतात आणल्यानंतर एनआयए आणि अन्य तपास यंत्रणा राणाची चौकशी करतील आणि त्यानंतर त्याच्यावर कोर्टात खटला चालवला जाईल. त्यानंतर शिक्षा सुनावली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.