Santosh Deshmukh Murder case: माझ्या भावाला सोडा! संतोष देशमुख हत्येपूर्वी धनंजय देशमुखांचा विष्णू चाटेला फोन...काय म्हटलंय जवाबात?

Santosh Deshmukh Murder case Dhananjay Deshmukh 20 Calls t0 Vishnu Chate: ज्या दिवशी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते. त्या दिवशी या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याने वाल्मिक कराड याला फोन केले होते, असे देशमुख यांनी सांगितले.
Walmik Karad, Vishnu chate
Walmik Karad, Vishnu chate Sarkaranama
Published on
Updated on

Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा जवाब साम टिव्हीच्या हाती लागला आहे. भावाला सोडण्यासाठी विष्णू चाटेला धनंजय देशमुख यांनी 20 हून अधिक फोन केले होते, अशी माहिती समोर येत आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या अगोदर त्यांचे अपहरण झाले होते. संतोष देशमुख यांचे अपहरण झाले असून आवादा कंपनीत त्यांना मारहाण होत असल्याची माहिती आपल्याला मित्रांकडून मिळाली होती, असे धनंजय देशमुख यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले.

ज्या दिवशी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते. त्या दिवशी या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याने वाल्मिक कराड याला फोन केले होते, असे देशमुख यांनी सांगितले. माझ्या भावाला सोडा, अशी विनंती धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटे याला केली होती.

Walmik Karad, Vishnu chate
PM Modi Nagpur Visit: दीक्षाभूमी,संघभूमी भेटीद्वारे PM मोदींनी साधलं सामाजिक संतुलन

"तुमच्या भावाला सोडतो, काहीही करीत नाही,'असे विष्णू चाटे याने धनंजय देशमुख यांना सांगितले होते १० मिनिटांत सोडतो, अर्धा तासात सोडतो, असे विष्णू चाटे यांने धनंजय देशमुख यांना सांगितले होते. माझ्या भावाच्या अपहरणाची तक्रार मी केज पोलिसांकडे केली होती,असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

संतोष देशमुख प्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे. वाल्मिक कराड याच्या वकिलांची जी कागदपत्रे मागितली होती ती त्यांना देण्यात आली आहे. वाल्मिक कराडला निदोष मुक्तता करा, असा अर्ज त्याच्या वकीलांनी न्यायालयात केला आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणपणे हत्या झाली.या प्रकरणाची पहिली सुनावणी 12 मार्च रोजी न्यायालयात झाली. पोलिसांनी 1800 पानांचे चार्जशीट न्यायालयात सादर केले आहे. घटना कशी घडली, पुरावे पोलिसांच्या हाती कसे लागले? याची सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com