Tahawwur Rana Sarkarnama
देश

Tahawwur Rana latest photo : मुंबई हल्ल्याचा 'मास्टरमाइंड' तहव्वूर राणाचा 'लेटेस्ट फोटो' आला समोर; तुम्ही बघितला का?

Latest Developments in the Tahawwur Rana Case : फक्त एकाच क्लिकवर बघा आता कसा दिसतोय भारताने अमेरिकेतून खेचून आणलेला तहव्वूर राणा?

Mayur Ratnaparkhe

Mumbai attack mastermind Tahawwur Rana photo : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात खेचून आणण्यात अखेर यश आलं आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा यांचं यशस्वी प्रत्यार्पण करून मोठे यश मिळवले आहे. आता तहव्वूर राणा भारतात आल्यानंतरचा त्याचा पहिला आणि लेटेस्ट फोटो समोर आला आहे.

सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी राणाला घेऊन NIA चं विमान दिल्ली विमानतळावर उतरलं. 6 वाजून 30 मिनिटांनी NIA टीम आणि राणा विमानातून बाहेर आले, त्यानंतर 6 वाजून 40 मिनिटांनी UAPA अंतर्गत राणावर अटकेची कारवाई झाली. पुढे विमानतळावरच राणाची वैद्यकीय चाचणी झाली अन् अखेर NIA ने तहव्वूर राणाचा ताबा घेतला.

याआआधी तहव्वूर राणा अमेरिकेत न्यायिक कोठडीत होता आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत कारवाई सुरू होती. अनेक वर्षे कायदेशीर प्रयत्न केल्यानंतर अखेर तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण पूर्ण झाले. भारतासाठी ही एक मोठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी छाप उमटवणारी महत्त्वाची बाब ठरली आहे.

Recently surfaced image of Tahawwur Rana

खरंतर कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट न्यायालयाने १६ मे २०२३ ला राणाच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. त्यानंतर राणाने त्याला भारतात आणलं जाऊ नये म्हणून प्रत्यारोपण अनेक याचिका दाखल केल्या, त्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. तसेच, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली सर्टिओरारी याचिका, दोन हेबियस पिटिशन्स न्यायालयाने फेटाळल्या. त्यानंतर अखेर भारत सरकारने यूएस सरकारकडून राणासाठी सरेंडर वॉरंट मिळवून त्याचे प्रत्यार्पण पूर्ण केले.

या प्रत्यार्पण प्रक्रियेत यूएस न्याय विभाग, यूएस स्काय मार्शल, तसेच भारतातील गुप्तचर संस्था, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) यांचा मोलाचा सहभाग होता. गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयानेही अमेरिकेतील संबधित संस्थांशी समन्वय साधत हा निर्णय यशस्वीपणे पूर्ण केला

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT