
Haryana Government Offer to Vinesh Phogat: भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या आमदार विनेश फोगाट यांनी हरियाणा सरकारच्या ऑफरवर आपल्या मागणीचे पत्र पाठवले आहे. विनेश फोगाट यांनी सरकारी नोकरी, चार कोटी रोख अन् प्लॉट यापैकी चार कोटी रोख बक्षीस अन् प्लॉट या दोन्हींची मागणी केली आहे. यावर आता हरियाणा सरकार अंतिम निर्णय देणार आहे.
सरकारच्या पहिल्या प्रस्तावानुसार विनेश फोगाट चार कोटी रुपये रोख रक्कमेचा पुरस्कार घेवू शकतात, दुसरा पर्याय प्रथम श्रेणी दर्जाची सरकारी नोकरी आणि तिसरा पर्याय एचएसवीपी प्लॉट आहे. विनेश फोगाट यांना यापैकी एक पर्याय निवडायचा होता. खरंतर विनेश फोगाट या आमदार झालेल्या आहेत. अशावेळी त्यांच्यासमोर रोख पुरस्कार व प्लॉटचाच पर्याय उपलब्ध आहे.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सांगितले होते की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरियाणाची लेक विनेश फोगाट हिला राज्याच्या क्रीडा धोरणानुसार स्पेशल केस म्हणून लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून पर्याय घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी विधानसभेत विनेश फोगाट यांनी हरियाणा सरकारने सांगूनही रौप्य पदाकाचे रोख रक्कमेचे बक्षीस न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
जुलाना मतदारसंघातील आमदार विनेश फोगाट यांनी मागील महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. विनेश फोगाट यांचे म्हणणे होते की, सरकारने त्यांना ऑलिंम्पिकमधील रौप्य पदकाच्या बरोबरचा पुरस्कार जाहीर केला होता, परंतु आठ महिने उलटल्यानंतरही त्यांना सन्मानित नाही केलं गेलं.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.