NIA officials revealing new details about Tahawwur Rana's widespread terror plans targeting multiple Indian cities, not just Mumbai.  sarkarnama
देश

Tahawwur Rana terror Plot : ''मुंबईच नाही तर देशभरातील अन्य शहरंही होती तहव्वूर राणाच्या टार्गेटवर'' ; 'NIA'चा मोठा दावा!

NIA's claim regarding Tahawwur Rana : तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली गेली आहे; जाणून, सविस्तर माहिती

Mayur Ratnaparkhe

NIA Investigation : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला गुरुवारी न्यायालयाने १८ दिवसांसाठी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) कोठडीत पाठवले आहे. दरम्यान एनआयए कडून तहव्वूर राणाबाबत एक मोठा दावा देखील केला गेला आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एनआयएने गुरुवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सांगितले की, तहव्वूर राणाच्या टार्गेटवर मुंबईसह देशातील अन्य शहरही होती. या शहरांमध्येही दहशतवादी हल्ले घडवण्याचा तो कट रचत होता. विशेष न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांच्या न्यायालयात एनआयएने हा मोठा दावा केला आहे.

याशिवाय, न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांनी सुनावणीवेळी एनआयएला असे आदेश दिले की, दर २४ तासांनी तहव्वूर राणाची वैद्यकीय तपासणी केली जावी तसेच पर्याची दिवशी त्याच्या वकिलास भेटण्याची परवानगी असेल. मात्र ही भेट केवळ एनआयएच्या अधिकाऱ्याच्या समक्षच होईल, तहव्वूर राणा आणि त्याच्या वकिलाच्या भेटीवेळी एनआयएचे अधिकारी तिथेच काही अंतरावर उपस्थित राहतील, परंतु ते तेवढ्याच अंतरावर थांबतील की त्यांना दोघांनाही ऐकता येईल.

२००८ मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय शेकडो लोक जखमी झाले होते. तसेच अनेक पोलिस शहीद झाले, ज्यात मुंबई पोलिसांच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. हा भयानक हल्ला पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दहा दहशतवाद्यांनी केला होता. यातील एक दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होत आणि नंतर २०१२ मध्ये त्याला फाशीही देण्यात आली.

तहव्वूर राणाला भारतात आणलं गेल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विशेष म्हणजे किरण बेदी यांनी यावर प्रतिक्रिया देतानाच काही सूचनाही केल्या आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT