
Kiran Bedi on Tahawwur Rana extradition : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात खेचून आणण्यात अखेर गुरुवारी(१० एप्रिल) यश आलं आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा यांचं यशस्वी प्रत्यार्पण करून मोठे यश मिळवले आहे. रात्री उशीरा तहव्वूर राणाला पटियाला हाउस कोर्टासमोर हजर करण्यात आले होते आणि एनआयएकडून रिमांडची मागणी करण्यात आली होती.
तर तहव्वूर राणाला भारतात आणलं गेल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विशेष म्हणजे किरण बेदी यांनी यावर प्रतिक्रिया देतानाच काही सूचनाही केल्या आहेत.
माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी म्हणाल्या, याआधीही कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आलेले आहे. मात्र तहव्वूर राणाच्या प्रकरणात असाधारण उपाययोजनांची आवश्यकता आहे, कारण याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय आहे.
तसेच किरण बेदींनी सांगितले की, मी सूचवेन की, शक्य असल्यास एकांत, उच्च सुरक्षा कारावास, इंटर एजन्सी मॉनेटरिंग आणि एआय(AI) देखरेख असावी. याचबरोबर अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चित दहशथवाद्यास नेण्या आण्यासोबतच सुनावणीवेळी अतिशय महत्त्वपूर्ण सुरक्षा उपाययोजनांचा समावेश केला गेला पाहिजे. यामध्ये बनावट शस्त्रांसह ताफे, व्हर्चुअल ट्रायल, कर्मचाऱ्यांच्या बॅकग्राउंडची तपासणी आणि कोर्ट रूमच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा समावेश असू शकतो. भारतामधील तुरुंगांच्या पायाभूत व्यवस्थांचे जागतिक मानांकनांना पूर्ण करण्यासाठी आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.
याशिवाय, किरण बेदींनी हेही सांगितले की, योग्य सुधारणा आणि इंटेलिजन्ससोबतच हे आवश्यक आहे की, कायदेशीर सुरक्षेसाठी समन्वय प्रणाली, तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक दूरदृष्टी असावी.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.