Dk Shivakumar Sarkarnama
देश

DK Shivakumar News : कर्नाटक काँग्रेसचे किंगमेकर डी. के. शिवकुमार उतरणार मध्य प्रदेशच्या रिंगणात...; निवडणूक रणनीती ठरवणार...

Congress News : दिल्लीत काँग्रेसची बैठक होणार आहे

सरकारनामा ब्यूरो

Madhya Pradesh Election News : कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले डी. के. शिवकुमार लवकरच मध्य प्रदेशच्या राजकारणात उतरणार आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना डी. के. शिवकुमार मदत करणार आहेत. मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) निवडणूक रणनीतीवर काम करणार असल्याची चर्चा आहे.

या अनुषंगाने बुधवारी (ता .24) मे रोजी दिल्लीत काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कोणत्या नेत्यांना मध्य प्रदेशात पाठवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. मध्य प्रदेशमध्ये सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसला नुकत्याच मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून मध्य प्रदेशातही काँग्रेस (Congress) कर्नाटकचा फॉर्म्युला स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत देशभरातील अनुभवी काँग्रेस नेत्यांना मध्य प्रदेशची जबाबदारी दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार, असल्याची माहीती मिळत आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील, तर राहुल गांधीही (Rahul Gandhi) या बैठकीत सहभागी होणार आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव, विरोधी पक्षनेते गोविंद सिंह, अजय सिंह, कांतीलाल भुरिया यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

तसेच प्रियांका गांधी 12 जून रोजी मध्य प्रदेशला जाणार आहेत. काँग्रेसच्या मीडिया विभागाला अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय पातळीवरील कही नेते जाणार आहेत. प्रियांका गांधी १२ जूनला जबलपूरला जाणार आहेत. तिथून त्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. प्रियांका गांधी यांचा रोड शो जबलपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वतः प्रियंका गांधींच्या कार्यक्रमाच्या तयारीची सूत्रे हाती घेतली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT