Anil Deshmukh Exclusive Interview: तुरुंगात असताना अनिल देशमुखांनी केला होता 'हा' विचार; 'सरकारनामा'च्या मुलाखतीत मोठा खुलासा

Anil Deshmukh Sarkarnama Interview: शंभर कोटी रूपयांच्या वसुलीच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल चौदा महिने तुरूंगात राहावे लागले.
Anil Deshmukh News
Anil Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Anil Deshmukh Shared Jail Moments: शंभर कोटी रूपयांच्या वसुलीच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तब्बल चौदा महिने तुरूंगात राहावे लागले. या 14 महिन्यांमध्ये त्यांनी तुरुंगामध्ये मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक फिटनेसवर परिणाम होऊ दिला नाही. फिटनेस टिकून ठेवण्यासाठी त्यांचा तुरुंगातील दिनक्रम कसा होता, हे त्यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले.

अटकेच्या चौदा महिन्यांच्या काळात देशमुख यांना मुंबईतील (Mumbai) ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. या चौदा महिन्यात खूप काही घडले. सरकारच्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देशमुख यांनी केला. ते म्हणाले, ''पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला ज्या बराक क्रमांक बारामध्ये ठेवण्यात आले त्या बराकमध्ये तब्बल चौदा महिने काढावे लागले.

Anil Deshmukh News
Jaibhavani Sugar Factory : राष्ट्रवादीच्या पंडितांनी 'जयभवानी' बिनविरोध काढला; भाजप आमदार अन् शिवसेनेच्या पंडितांना पॅनलही टाकता नाही आला

एका खोट्या गुन्हात बनाव करून मला अडकविण्यात आले. कुटुंबातील लहान मुलांनादेखील चौकशीतून सोडण्यात आले नाही. मात्र, या काळात मी मानसिक व शारिरीकदृष्टया खंबीर राहण्याचा प्रयत्न केला. तुरुंगामध्ये असतानाही कधी वाटले नाही का की हे राजकारण नको, असा कधी विचार आला का? यावर देशमुख म्हणाले, ''मी तुरुंगात असताना विचार केला अनिल देशमुख तुला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. मेंटली डिस्टर्ब होऊन जर त्याचा स्वत: वर परिणाम करुन घेतला, तर बाहेर आल्यानंतर त्याचा बदला घेऊ शकणार नाही की लोकांना वस्तुस्थिती सांगू शकणार नाही. त्यामुळे मी माझी मानसिक स्थिती अगदी व्यवस्थित ठेवली.''

''मी तुरुंगात दररोज सगळे न्यूज पेपर पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचून काढत होतो. त्यामध्ये दोन तीन तास जायचे. तसेच दररोज पुस्तकं वाचायचो. मी आतापर्यंत जेवढी पुस्तकं वाचली नाहीत, तेव्ही पुस्तकं तुरुंगातील 14 महिन्यामध्ये वाचली. त्याच बरोबर एक तास व्यायाम करत होतो. त्यामुळे मानसिक आणि शारिरीक फिटनेसवर परिणाम झाला नाही. मला तुरुंगात घरचे जेवण मिळाले नाही. मी जेलचे जेवण केले, इतका माझा छळ करण्यात आला. मात्र, नियमित व्यायामामुळे काही परिणाम झाला नाही'' असे अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले.

Anil Deshmukh News
Rajesh Tope On ED Action : जयंत पाटील भान ठेवून काम करणारा व चांगले विचार जपणारा नेता

''तुरूंगातील चौदा महिन्यांच्या काळात काही महिने मंत्री नवाब मलिक व खासदार संजय राऊत यांची भेट होत असे. राऊत यांच्याशी चर्चा होत असे. ते रोज काहितरी लिहित असत. ते मलाही लिहिण्याचा आग्रह करू लागले. त्यामुळे मी खूप वाचले आणि लिहायला सुरवात केली. या लेखनातून एक चांगले पुस्तक तयार झाले. पुस्तकाचे नाव व त्यातील तपशील लवकरच कळेल.''

''एका खोट्या आरोपाखाली मला अटक करण्यात आली. चौदा महिने विनाकरण तुरूंगात राहावे लागले याचे वाईट वाटते. मात्र, या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वच नेते आणि स्वत: शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्या कुटुंबाची काळजी घेतली हे मी कधी विसरू शकणार नाही, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर मी मतदारसंघाकडे पूर्ण लक्ष दिले आहे. मतदारसंघातील जनतेचा मला प्रचंड पाठिंबा आहे,'' असेही देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com