Tamil Nadu News : तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडताना दिसत असून अण्णाद्रमुकने (एआयएडीएमके) विश्वासदर्शक ठरावात जोसेफ विजय यांना मतदान करणाऱ्या आमदारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बंडखोरी करणाऱ्या 25 आमदारांपैकी 21 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई मागे घेण्यात आली असून 4 आमदावर मात्र कारवाई केली जाईल अशी घोषणा पक्षाचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी यांनी केली आहे. पलानीस्वामी यांनी त्या आमदारांनी केलेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्र सभापतींना दिल्याचे सांगत यानंतर सभापतींनी विधानसभा नियमावलीनुसार कारवाई रद्द केल्याचे सांगितले आहे.
नव्याने स्थापन झालेल्या जोसेफ विजय यांच्या (तमिळगा वेत्री कळघम) टीव्हीके सरकारचा विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी मोठ्या घडामोडी झाल्या. अण्णाद्रुमुक पक्षाच्या 25 आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारुन विजय यांच्या बाजूने मतदान केले होते. ज्यानंतर अण्णाद्रमुक पक्षाने या आमदारांची हकालपट्टी केली होती. तसेच २५ आमदारांची पदे काढून घेत त्यांच्या जागी नवीन जिल्हा सचिवांची नियुक्ती केली.
तर पक्षादेशाच्या विरोधात जाऊन मतदान करणाऱ्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करणारी मागणी सभापती यांच्याकडे केली होती. त्याबाबत याचिका सादर करत पक्षांतरबंदी कायद्यानुसार, बंडखोरांना आमदार म्हणूनही अपात्र ठरवले जाऊ शकते, त्यामुळे रिक्त होणाऱ्या सर्व जागांवर पोटनिवडणूक घेण्याची वेळ येऊ शकते, असेही अण्णाद्रमुक पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यान आता तमिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी मागणी करणाऱ्या अण्णाद्रुमुक पक्षानेच क्षमा याचनेचं निवदेन विधानसभा अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर यांना पाठवलं आहे. एआयएडीएमकेचे (AIADMK) सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी 21 आमदारांच्या कृतीबद्दल माफी दर्शवली होती. याबाबत विधानसभा अध्यक्ष प्रभाकर यांनी महिती दिली.
ते म्हणाले की, एआयएडीएमकेचे (AIADMK) सरचिटणीस एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्याकडून चार स्वतंत्र पत्रे मिळाली आहेत. या पत्रातून त्यांनी बंडखोर 21 आमदारांवरील पुढील कारवाई थांबवल्याची मागणी केली होती. ज्यानंतर या पत्रांची आणि विधानसभा नियमावलीची तपासणी केल्यांतर आता त्या 21 बंडखोर आमदारांवरील कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र राजीनामा देऊन टीव्हीके (TVK) पक्षात सामील झालेल्या चार बंडखोर आमदारांविरुद्ध कारवाई सुरू आहे. मरगाथम कुमारवेल (मदुरंतकम), एस. जयकुमार (पेरुंदुरई), पी. सत्यभामा (धारापुरम) आणि एसकी सुबया (अंबासमुद्रम) यांच्याबाबत निर्णय नंतर घेतला जाईल असे संकेत विधानसभा अध्यक्षांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.