Tamil Nadu Gas Leakage Tragedy News : तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यात मोठी दुर्दैवी घटना घडली असून एका कारखान्यात झालेल्या अमोनिया वायू गळतीत तब्बल ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 पेक्षा अधिक लोकांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री विजय यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेचा आढावा घेत ही घटना नेमकी कशामुळे आणि का घडली याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशीसाठी एका समितीच्या स्थापनेची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरिपालयम येथे घडली असून घटनास्थळी मदतकार्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्री विजय यांनी स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तर या घटनेत ७ महिलांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पेरिपालयम येथील सी-फूड कारखान्यात कोळंबीवर प्रक्रिया केली जाते. या कारखान्यात अनेक मजूर काम करत असून रोजच्या प्रमाणे आज (21 जून) देखील अनेक मजूर काम करत होते.
या दरम्यान कारखान्यात अचानक अमोनिया गॅसची गळती झाली. ज्यानंतर अनेक कामगारांना श्वास घेणे कठीण झाले. तर काहीच वेळानंतर काही कामगारांची प्रकृती खालावली. या घटनेत तब्बल 60 पेक्षा जास्त लोक बाधित झाले असून कामगार बेशुद्ध झाले होते. यामुळे कंपनीत एकच खळबळ उडाली. बेशुद्ध झालेल्या सर्व कामगारांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात असून कामगारांच्या नाक आणि तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याचे समोर आले आहे. तर हे कामगार उत्तर भारतातील विविध राज्यांतील स्थलांतरित आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी, बाधित झालेल्या ६७ जणांना तातडीने स्थानिक वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती दिली असून गंभीररीत्या बाधित असलेल्या 9 जणांना तातडीने चेन्नई येथील एका रूग्णालयात दाखल केल्याचे म्हटले आहे. तर त्या 9 जणांवर तेथे उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान या घटनेवर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी, ही घटना समोर येताच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले असून ती तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरियापलायम येथील एका गावात झाल्याचे म्हटलं आहे. तसेच या घटनेमुळे आपल्याला दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच या कठीण काळात मृतांच्या कुटुंबीयांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना व्यक्त करत असल्याचे म्हणत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, ते लवकर बरे व्हावेत अशी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.