LPG Cylinder Price Update : आता सीएनजीसारखाच एलपीजी गॅसचाही मोठा झटका? सिलिंडर बुक करण्यापूर्वी 'हा' मोठा बदल नक्की वाचा!

LPG cylinder booking new rules : CNG दरवाढीनंतर आता LPG गॅस सिलिंडरबाबतही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सिलिंडर बुक करण्यापूर्वी नवीन नियम, दर आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या.
LPG cylinder price hike in India
LPG cylinder price hike in India Sarkarnama
Published on
Updated on

Big change in LPG gas cylinder booking: पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना आता एलपीजी गॅसबाबातही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसात इंधन दरात सतत वाढ होत असल्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता चर्चेत आली आहे. त्यामुळे सिलिंडर बुक करण्यापूर्वी ग्राहकांनी ताज्या दरांची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

मागील 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये तब्बल 4 वेळा वाढ करण्यात आली आहे. त्यातच आज सकाळी सीएनजीच्या दरातही वाढ झाल्याने वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यव्यवसायांमध्ये खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.

LPG cylinder price hike in India
Gokul Controversy : 'गोकुळ' निवडणुकीची प्रक्रिया सुरु होताच जुन्या वादाला नवा तडका : अधिकाऱ्यांनी मोठा निकाल ठेवला गुलदस्त्यात

तसेच, आजच्या घडीला घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवले आहेत. दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत 913 आहे. मुंबईमध्ये हा सिलिंडर 912.50 ला मिळत आहे. कोलकातामध्ये 939 तर चेन्नईमध्ये 928.50 इतका दर कायम आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने भविष्यात गॅस दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराण, इस्त्राइल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असून इंधन आयात खर्च वाढत आहे.

LPG cylinder price hike in India
Jalna political news today : महापालिका, जिल्हा परिषदेत पिछाडीवर पडलेली शिवसेना स्थानिक'साठी भाजपशी पंगा घेण्याच्या तयारीत!

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात यापूर्वी मोठी वाढ झाली असून मुंबईत सध्या कमर्शियल सिलिंडरचा दर 3024 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता घरगुती सिलिंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी घरगुती गॅसच्या दरात 60 वाढ झाली होती. मात्र त्यानंतर दर स्थिर ठेवण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात घरगुती सिलिंडर 50 ते 100 पर्यंत महाग होऊ शकतो, अशी चर्चा बाजारात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com