Tamil Nadu News : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (माकपा)च्या तक्रारीवरुन एका भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. समाज माध्यमांवर माकपाची बदनामी केल्याचा आरोप या नेत्यावर आहे.
तामिळनाडू भाजपचे प्रदेश सचिव एसजी सुर्या यांनी शुक्रवारी रात्री चैन्नई येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एस जी सुर्या यांच्या अटकेनंतर तामिळनाडूमधील भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी या कारवाईची निंदा केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही गदा आहे,असे अन्नामलाई यांनी म्हटलं आहे. त्यांनी टि्वट करीत या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला आहे.
सूर्या यांची अटक ही बेकायदा आहे, असे अन्नामलाई यांनी म्हटलं आहे. द्रमुकचे सहकारी कम्युनिस्टांचा खरा चेहरा समाजासमोर आणला आहे. सूर्या यांच्या अटकेमुळे आम्ही घाबरणार नाही, या प्रकरणातील सत्य समोर येईल, असे अन्नामलाई यांनी सांगितले.
दरम्यान, मणिपूर रॅपीड अॅक्शन फोर्स (Mainpur Rapid Action Force) आणि दंगलखोर यांच्यात (Mainpur Clashes) पुन्हा एकदा चकमक झाली आहे. दंगलखोरांनी गोदाम जाळले आणि इतर ठिकाणीही जाळपोल केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना आश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दंगल इम्फाळ पॅलेस मैदानाजवळ झाली. दंगलखोरांनी एक गोदाम पेटवून दिले. ज्यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही आग लागली. आगीत आदिवासी समाजातील निवृत्त हाय-प्रोफाइल आयएएस अधिकाऱ्याचीही इमारत होती. अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत गोदामाची आग आटोक्यात आणली आणि शेजारच्या घरांमध्ये पसरण्यापासून रोखले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.